कपिल शर्माचा चिमुरडा खेळत होता, कुत्र्याने हल्ला करत चेहरा फाडला, तब्बल 52 टाके...

viral news : भटक्या कुत्र्याने चार वर्षीय चिमुरड्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कुत्र्याने चिमुरड्याच्या जबड्याचा चावा घेतला. रुग्णालयात त्याच्या जबड्याला 25 टाके घालण्यात आल्याचे वृत्त समोर आले.

dog ​​attacked a four-year-old child

dog ​​attacked a four-year-old child

मुंबई तक

• 09:00 AM • 12 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

कपिल शर्माच्या मुलावर कुत्र्याने केला हल्ला 

point

मुलाच्या चेहऱ्यावर अंदाजे 52 टाके

Viral News : एका भटक्या कुत्र्याने चार वर्षीय चिमुरड्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बिजनौर जिल्ह्यातील हलदौर पोलीस ठाणे परिसरात मंगळवारी भयानक घटना घडली आहे. मुलगा घराबाहेर खेळत असताना ही धक्कादायक घटना घडल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात कुत्र्याने चिमुरड्याच्या चेहऱ्याला चावा घेतला, अशातच त्याच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त आहे. या दुखापतीमुळे 52 टाके घालावे लागले आहेत. या घटनेचा थरार हा एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे, ज्यामुळे घटनास्थळी भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. ज्या मुलावर कुत्र्याने हल्ला केला त्याचं नाव शंतनू असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुण्यात भीषण अपघात, ई-बसने गर्भवती महिलेला दिली धडक, तर 9 वर्षीय सख्ख्या बहिणीचा दुर्दैवी अंत

कपिल शर्माच्या मुलावर कुत्र्याने केला हल्ला 

एका वृत्तानुसार, झालहू शहरातील जोशीयन मोहल्ला येथील रहिवासी कपिल शर्माचा मुलगा शंतनू गळ्यात छोटा ढोल बांधून खेळत होता. तेव्हा कुत्र्याने चिमुरड्यावर जोराचा हल्ला केला, हा हल्ला इतका तीव्र होता की, त्याला आपला बचाव करता आला नाही.

मुलाच्या चेहऱ्यावर अंदाजे 52 टाके

मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील लोक घटनास्थळी दाखल झाले होते. तेव्हा त्यांनी कुत्र्याला घटनास्थळावरून पळवून लावले होते. यानंतर शंतनूला एका रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी त्याच्या चेहऱ्यावर अंदाजे 52 टाके घातल्याची माहिती समोर आली होती. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, मुलाला अनेक जखमा झाल्या होत्या आणि त्याच्या जबड्याला गंभीरपणे दुखापत झाल्याचे वृत्त आहे.

 

शंतनूची प्रकृती गंभीर

शंतनूची सध्या प्रकृती गंभीर असून त्याला बिजनोरहून मेरठ मेडिकल कॉलेजमध्ये जाण्यास सांगितलं. मेरठमध्ये डॉक्टरांनी शंतनूची प्रकृती तपासली असता, त्याला दिल्लीतील एका मोठ्या रुग्णालयात पाठवण्यात आले होते. सध्या शंतनूवर दिल्लीत उपचार सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा : एक्सप्रेसवेवरील टोल नाक्यावर कारमध्ये रोमान्स, मॅनेजरची नजर नको तिथेच... प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांकडे

या घटनेनं परिसरातील रहिवासी भयभीत झाले आहेत. परिसरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. या परिस्थितीकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा घटना रोखण्यासाठी त्वरित कारवाईची मागणी देखील करण्यात येत आहे.

    follow whatsapp