अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध, पण तिचा जीव दुसऱ्यावर जडला, दोघांनी मिळून अभयला संपवलं अन् मृतदेह दरीत फेकला

Crime News : तपासानुसार, मृतक अभय दास आणि अल्पवयीन मुलीमध्ये प्रेमसंबंध होते. काही महिन्यांनी या मुलीची ओळख आशुतोषशी झाली आणि दोघांमध्ये नवीन नातं निर्माण झालं. यामुळे तिघांमध्ये तणाव वाढत गेला. अखेर या प्रेमसंबंधांना अडथळा ठरत असलेल्या अभयला हटवण्याचा कट रचण्यात आला.

Crime News

Crime News

मुंबई तक

12 Dec 2025 (अपडेटेड: 12 Dec 2025, 02:09 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध, पण तिचा जीव दुसऱ्यावर जडला

point

दोघांनी मिळून अभयला संपवलं अन् मृतदेह डोंगरात फेकला

Crime News : ओडिशातील संबलपूर जिल्ह्यात खेत्राजपूर परिसरातील लक्ष्मीडुंगुरी टेकडीवर सापडलेल्या युवकाच्या मृतदेह प्रकरणाचा मोठा उलगडा झालाय. 21 वर्षीय अभय दास या युवकाची हत्या ‘लव्ह ट्रायंगल’मुळे करण्यात आल्याचं तपासात स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी आशुतोष दासला अटक केली असून या प्रकरणात सामील असलेल्या अल्पवयीन मुलीला बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. हत्येच्या वेळी उपस्थित असलेला तिसरा आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

हे वाचलं का?

प्रकरण नेमकं काय?

तपासानुसार, मृतक अभय दास आणि अल्पवयीन मुलीमध्ये प्रेमसंबंध होते. काही महिन्यांनी या मुलीची ओळख आशुतोषशी झाली आणि दोघांमध्ये नवीन नातं निर्माण झालं. यामुळे तिघांमध्ये तणाव वाढत गेला. अखेर या प्रेमसंबंधांना अडथळा ठरत असलेल्या अभयला हटवण्याचा कट रचण्यात आला.

अशा पद्धतीने केली हत्या

योजनेनुसार अल्पवयीन मुलीने अभयला टेकडीवर बोलवलं. त्याला कोल्ड ड्रिंक देण्यात आलं, ज्यामध्ये नशेचं औषध मिसळलेलं होतं. पेय घेतल्यानंतर अभय बेशुद्ध पडताच त्याच्यावर चाकू आणि सर्जिकल ब्लेडने वार करण्यात आले. त्यानंतर मृतदेह दरीत फेकून आरोपी तेथून पसार झाले. तपासात असंही समोर आलं की नशेचं औषध आणि ब्लेड हे तेच उपकरण होते जे आशुतोष काम करत असलेल्या रुग्णालयातून आणले होते.

पित्याला दिसली स्कूटी आणि उलगडलं रहस्य

संबलपूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अजय कुमार मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 डिसेंबरपासून अभय हरवला होता. त्याचा वडील रामानंद दास यांनी खूप शोधूनही तो न मिळाल्याने खेत्राजपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. घरी परतताना त्यांना रस्त्याकाठावर मुलाची स्कूटी दिसली. सुरुवातीला त्यांना वाटलं की तो पेट्रोल भरण्यासाठी गेला असावा. मात्र 100 मीटर अंतरावर त्यांना मुलाचे चप्पल दिसले. आसपासच्या टेकडी भागात शोध घेतला असता त्यांना मुलाचा मृतदेह दिसला. शरीरावर छाती, हात, गळा आणि डोक्यावर जखमांचे तसेच चाकूचे वार असल्याचे आढळले.

मुख्य आरोपी आशुतोषच्या मुसक्या आवळल्या

तक्रार मिळताच वरिष्ठांच्या आदेशावरून विशेष पथक तयार करण्यात आलं. एसडीपीओ सदर, एसडीपीओ बुर्ला, तसेच बुर्ला आणि खेत्राजपूर पोलीस ठाण्यांचे अधिकारी या टीममध्ये होते. विविध अँगल्समधून तपास करताना मोबाईल लोकेशन, पुरावे आणि तांत्रिक माहितीची तपासणी करण्यात आली. या तपासातून सोनपूर जिल्ह्यातील रहिवाशी आणि नर्सिंग इंटर्न असलेला आशुतोष दास हा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. वैद्यकीय क्षेत्रातील थोडंफार ज्ञान असल्यामुळे त्याने हत्या करण्यासाठी लागणारे नशायुक्त पदार्थ आणि ब्लेड सहज मिळवले होते. तिसरा आरोपी अद्याप फरार असून पोलिसांनी त्याचा शोध अधिक गतीने सुरू केला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

प्रायव्हेट पार्टमध्ये कापडाचे तुकडे आढळले, बॉयफ्रेंडसोबत राहात असलेल्या मानसीची क्रूरतेने हत्या, 6 महिन्यांपूर्वीच..

    follow whatsapp