Maharashtra Weather : राज्यात थंडीची लाट कायम, तर 'या' विभागातील जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

maharashtra weather : महाराष्ट्रात एकूणच कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, 12 डिसेंबर रोजी राज्याच्या अंतर्गत भागात थंडावा कायम राहणार आहे.

Maharashtra Weather

Maharashtra Weather

मुंबई तक

• 05:00 AM • 12 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

महाराष्ट्रात एकूणच कोरडे हवामान

point

भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार काय सांगतं हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : महाराष्ट्रात एकूणच कोरडे हवामान राहण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, 12 डिसेंबर रोजी राज्याच्या अंतर्गत भागात थंडावा कायम राहणार आहे, तर किनारी भागात सामान्य हवामान राहील. परंतु सकाळी काही ठिकाणी हलके धुके असण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुणे : आरोपी बंडू आंदेकर पुणे महापालिका निवडणूक लढवणार, न्यायालयानं दिला महत्त्वाचा निर्णय

कोकण विभाग :

कोकण विभागात मुख्यत्वे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि मुंबई यांचा समावेश होतो. या पैकी मुंबईत थंडीच्या प्रमाणात वाढ झाल्याची हवामान विभागाने माहिती दिली आहे.

मध्य महाराष्ट्र विभाग :

मध्य महाराष्ट्र विभागात धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा समावेश होतो. यापैकी जळगाव, नाशिक, अहिल्यानगर या तिन्ही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने थंडीचा अलर्ट जारी केला आहे. तर उर्वरित पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीत हवामान विभागाने कोरड्या हवामानाचा अंदाज जारी केला आहे.

मराठवाडा विभाग :

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच बीड आणि लातूर या दोन जिल्ह्यांत हवामान विभागाने कोरड्या वातावरणाचा अंदाज जारी केला आहे.

हे ही वाचा : तरुणांनी Zomato वरून मागवलं चिकन, जेवताना आढळली पाल, नंतर तरुणाची लागली वाट!

विदर्भ विभाग :

विदर्भ विभागातील गोंदिया, नागपूर आणि वर्ध्यात हवामान विभागाने थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच यवतमाळ, गडचिरोली, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा या जिल्ह्यांत हवामान विभागाने कसलाही अलर्ट जारी केला नाही.

    follow whatsapp