चावी फिरवत-फिरवत शाळेत आली आणि थेट चौथ्या मजल्यावरून उडी मारली, 10 वीच्या मुलीचं ते कृत्य CCTV मध्ये कैद

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका 10 वीच्या विद्यार्थीनीने शाळेच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन स्वत:चा जीव गमावला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Viral Video Grab

Viral Video Grab

मुंबई तक

27 Jul 2025 (अपडेटेड: 28 Jul 2025, 09:57 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शाळेच्या चौथ्या मजल्यावरुन विद्यार्थीनीने मारली उडी

point

10 वीच्या विद्यार्थीनीने स्वत:ला संपवलं

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका 10 वीच्या विद्यार्थीनीने शाळेच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन स्वत:चा जीव गमावला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच गोंधळ उडाला आहे. चौथ्या मजल्यावरुन खाली पडल्याने पीडिता गंभीर स्वरुपात जखमी झाली. त्यावेळी तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ही धक्कादायक घटना शाळेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा तपास करत असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे वाचलं का?

चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन गमावला जीव

नवरंगपुरा परिसरातील सोम ललित शाळेत ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. या दु:खद घटनेने संपूर्ण परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. शाळेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडित विद्यार्थिनी दुपारी 12:30 च्या सुमारास शाळेच्या लॉबीमध्ये चाव्या फिरवत चालत होती. त्यानंतर अचानक तिने रेलिंग ओलांडून इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन उडी मारली. त्यावेळी पीडितेच्या मैत्रिणींनी देखील तिला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तिने उडी मारुन स्वत:चं आयुष्य संपवलं.

हे ही वाचा: तीन मुलांची आई 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलासोबत गेली पळून, वडील म्हणाले, "घरी नेहमी यायची..."

उपचारादरम्यान मृत्यू   

दुपारी मधल्या सुट्टीत ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. पीडित विद्यार्थीनीने उडी मारल्यानंतर संपूर्ण शाळेत आरडाओरडा सुरु झाला. तिथे असणाऱ्या इतर विद्यार्थीनी सुद्धा रेलिंगजवळ धावत गेल्या. शिक्षक देखील तातडीने बाहेर आले. उडी मारल्यानंतर पीडितेला गंभीर दुखापत झाली. डोक्याला खोल जखमा आणि तिच्या हात आणि पायांच्या हाडांमध्ये फ्रॅक्चर झाल्याचं समोर आलं. यानंतर तिला लगेच जवळच्या रुग्णालयात नेऊन आयसीयूमध्ये भरती करण्यात आलं. पीडितेच्या नातेवाईकांनी तिला थलतेज येथील दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. मात्र, रुग्णालयात उपाचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं.

पोलिसांच्या माहितीनुसार, विद्यार्थीनीने आत्महत्या करण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट नाही. घटनेसंदर्भात अधिक माहिती मिळवत असल्याचं पोलीसांनी सांगितलं. सध्या प्रकरणात कोणताही गैरप्रकार झाल्याचा संशय नसून सर्व बाजूंची विचार करत चौकशी सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

हे ही वाचा: Personal Finance: स्टॅम्प ड्युटी भरली तर तुम्हालाही मिळू शकतो Tax Benefit, पण नेमकं कसं?

मधल्या सुट्टीत चौथ्या मजल्यावरुन मारली उडी...

शाळेच्या व्यवस्थापकांच्या मते, मागील पाच वर्षांपासून विद्यार्थीनी शाळेत शिकत असून तिने 1 महिन्यांच्या सुट्टीनंतर 10 दिवसांपूर्वीच शाळेत येण्यास सुरुवात केली होती. पीडितेने शाळेत आल्यानंतर मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा जमा केलं होतं. मुलीचे वडील तिला सकाळी शाळेत सोडण्यासाठी आले होते. विद्यार्थ्यांना याबाबत विचारलं असता वर्गात तास सुरु असताना पीडिता अचानक ओरडली असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यावेळी शिक्षकांनी तिला शांत केलं. नवरंगपुरा पोलिसांनी या प्रकरणासंदर्भात मेडिको-लीगल गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी शाळेतील शिक्षक, कर्मचारी आणि काही विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवले आहेत. दरम्यान, शाळेतील सीसीटीव्ही फुटेजची देखील तपासणी केली जात आहे. मुलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

 

    follow whatsapp