मुंबईची खबर: मेट्रो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आणखी एक मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार... कसा असेल रूट?

मेट्रो-3 कॉरिडोरनंतर आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) कडून मेट्रो-2 B चा पहिला टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची बातमी समोर आली आहे.

आणखी एक मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार...

आणखी एक मेट्रो सेवा लवकरच सुरू होणार...

मुंबई तक

• 04:06 PM • 19 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मेट्रो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी!

point

आणखी एक मेट्रो सेवा लवकरच खुली होणार...

Mumbai News: राज्यातील मेट्रो प्रवाशांसाठी लवकरच आणखी सुखकर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मेट्रो-3 कॉरिडोरनंतर आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) कडून मेट्रो-2 B चा पहिला टप्पा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची बातमी समोर आली आहे. MMRDA च्या माहितीनुसार, मेट्रो-2 B ला मंडला (मानखुर्द) ते डायमंड गार्डन रोड (चेंबूर) पर्यंत सेवा सुरू करण्यासाठी सीएमआरआयकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती समोर आली आहे. 

हे वाचलं का?

पहिल्या टप्प्यात 5.6 किमी मार्गिकेवर सेवा सुरू करण्यासाठी MMRDA ने मेट्रो रेल्वे सेफ्टी बोर्डाकडून (सीएमआरएस) अनिवार्य प्रमाणपत्र देखील मिळवलं आहे. कॉरिडोरवर सध्या साफसफाई आणि रंगरंगोटीचं काम सुरू असल्याची माहिती आहे.

लवकरच सेवा प्रवाशांसाठी खुली होणार

ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी ही मेट्रो सेवा प्रवाशांसाठी खुली होणार असल्याचं सांगितलं जात आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी ही सेवा सुरू करण्यापूर्वी शनिवारी (18 ऑक्टोबर) MMRDA कमिश्नर डॉ. संजय मुखर्जी यांनी तयारीचा आढावा घेण्यासाठी मेट्रो स्टेशनला भेट दिली. एप्रिलपासून या मेट्रो 2B मार्गावर ट्रायल रन सुरू आहे.

हे ही वाचा: Govt Job: ONGC मध्ये 2700 हून अधिक पदांसाठी थेट भरती! कोणत्याही परीक्षेशिवाय होणार निवड... लवकरच करा अर्ज

'या' 5 स्थानकांवर धावणार 

डीएन नगर ते मंडला दरम्यान 23.6 किमी लांब मेट्रो मार्गिका तयार केली जात आहे. संपूर्ण मार्गाचे बांधकाम पूर्ण न झाल्यामुळे, पहिल्या टप्प्यात फक्त 5.6 किमी मार्गावर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 5.6 किमी मार्गावर मंडला, मानखुर्द, बीएसएनएल, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि डायमंड गार्डन स्टेशन असणार आहेत.

हे ही वाचा: राज ठाकरेंकडून पुन्हा 'लाव रे तो व्हिडीओ', पीएम मोदी अन् शिंदेंच्या आमदारांचे व्हिडीओ दाखवले, निवडणूक आयोगाला घेरलं

मेट्रो टू बी, एलिव्हेटेड रूट

मंडला-चेंबूर मार्गावर धावणारी 'मेट्रो टू बी' असून हा एलिव्हेटेड रूट मंडला ते ईएसआयसी नगर (अंधेरी पश्चिम) पर्यंत असेल. या मार्गाचा पहिला टप्पा मंडला ते डायमंड गार्डन, चेंबूर असा प्रस्तावित आहे. या पहिल्या टप्प्याचं सुरक्षा प्रमाणपत्र, विविध चाचण्या आणि निरीक्षण पूर्ण झालं आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर 15 दिवसांनंतर मेट्रोला त्याचं सुरक्षा प्रमाणपत्र मिळालं आहे. 
 

    follow whatsapp