Mumbai News: मुंबईच्या पहिल्या अंडरग्राउंड मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. मेट्रो-3 च्या पूर्ण मार्गिकेवर सेवा सुरू झाल्यानंतर एका आठवड्यातच अंडरग्राउंड मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या तिप्पट झाल्याचं दिसून येत आहे. पंतप्रधान मोदींनी 8 ऑक्टोबर रोजी आचार्य अत्रे चौक ते कफ परेड पर्यंत 10.99 किमी लांबी असलेल्या मेट्रो-3 च्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन केलं होतं.
ADVERTISEMENT
8 ऑक्टोबरपर्यंत, दररोज आरे ते आर्चार्य अत्रे चौक या 22.65 किमी लांबीच्या मेट्रो-3 मार्गिकेवर केवळ 60,000 प्रवासी प्रवास करत होते. पंतप्रधान मोदींच्या उद्घाटनानंतर, 9 ऑक्टोबर रोजी 33 किमी लांबीचा हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात आला.
हे ही वाचा: गरोदर महिला तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेली, पण अल्ट्रासाउंड करताना डॉक्टरचे अश्लील कृत्य... प्रकरण थेट पोलिसात
प्रवाशांची संख्या 1,76,000 च्या पुढे...
कफ परेडपर्यंत मेट्रो सेवा सुरू होण्यापूर्वीच, मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या 60,000 वरून 1,56,000 पर्यंत वाढली होती. आता, मेट्रो प्रवाशांची संख्या 1,76,000 च्या पुढे गेल्याचं पाहायला मिळतंय. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिलेल्या माहितीनुसार, या आरामदायी सेवेमुळे मेट्रो प्रवाशांची संख्या दररोज सुमारे 10 हजारांनी वाढत असल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: कामवाल्या बाईने खेळण्यातली बंदूक दाखवून मालकीणीला लुटलं अन् लाखो रुपये घेऊन फरार...
प्रवाशांची मोठ्या प्रमाणात पसंती
या भूमिगत मेट्रोच्या माध्यमातून सरकारने मुंबईतील अशी ठिकाणे जोडली आहेत जी आतापर्यंत रेल्वेने जोडलेली नव्हती. रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या अभावामुळे, प्रवाशांना त्यांच्या अंतिम म्हणजेच गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी रस्त्यावर वाहतूक कोंडीचा सामना करत प्रवास करावा लागत होता. आता या मेट्रोचा कफ परेडपर्यंत विस्तार केल्याने प्रवाशांना प्रवासाचा एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे. पूर्वी बस, टॅक्सी किंवा लोकल ट्रेनने प्रवास करणारे प्रवासी आता मेट्रोच्या जलद आणि आरामदायी प्रवासामुळे मेट्रोला पसंती देत आहेत.
ADVERTISEMENT
