कोल्हापुरात जन्मलय तीन डोळ्यांचे वासरु, भगवान शंकराचा अवतार असल्याची देवकर परिवाराची भावना!

Kolhapur News : कोल्हापुरात जन्मलय तीन डोळ्यांचे वासरु, भगवान शंकराचा अवतार असल्याची देवकर परिवाराची भावना!

Mumbai Tak

मुंबई तक

17 Oct 2025 (अपडेटेड: 17 Oct 2025, 03:46 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कोल्हापुरात जन्मलय तीन डोळ्यांचे वासरु

point

भगवान शंकराचा अवतार असल्याची देवकर परिवाराची भावना!

Kolhapur News : कोल्हापूर पासून जवळ असलेल्या कात्यायनी गावच्या परिसरात चक्क तीन डोळे असलेल्या वासराचा जन्म झाला आहे. त्याचे तिन्ही डोळे व्यवस्थित काम करत आहेत. त्याला तिन्ही डोळ्यांनी व्यवस्थित दिसत आहे. डॉक्टरांनी त्याची तपासणी करून ते सुदृढ असल्याची खात्री दिली आहे. दरम्यान, हे वासरु भगवान शंकराचा अवतार असल्याची भावना वासराचे मालक असलेल्या देवकर कुटुंबियांनी बोलून दाखवली आहे. दरम्यान, तीन डोळे आणि चार नाकपुड्या असलेलं वासरु जन्मल्याने परिसरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : पतंग आणण्यासाठी रेल्वे रुळ ओलांडला, परत येताना आनंद गगनात मावेना; पण 9 वर्षीय कनिष्कासोबत आक्रित घडलं

वासराचे दीर्घकाळ जगण्याचे चान्सेस, डॉक्टरांनी वासराबाबत सगळंच सांगितलं 

"तसा हा जुळ्याचा प्रकार असू शकतो. पण बाकी अवयव एकेकच असल्यामुळे यावर अधिक बारकाईने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कारण अशी विचित्र बालके किंवा जनावरे फार काळ जगू शकत नाहीत. पण हे वासरू फक्त नाकपूडी आणि तीन डोळे असे अवयव घेऊन जन्माला आल्याने आणि बाकी अवयव व्यवस्थित असल्यामुळे त्याचे दीर्घकाळ जगण्याचे चान्सेस आहेत. सध्या त्याला तिन्ही डोळ्यांनी दिसत असल्याने त्याचे कन्फ्यूजन होत आहे. पण हळूहळू सरावाने ते व्यवस्थित चालू व पळू शकेल असे डॉक्टरांनी सांगितलं आहे", असं वासराचे मालक देवकर यांनी 'मुंबई तक'शी बोलताना स्पष्ट केले आहे.

तीन डोळे आणि चार नाकपुड्या असलेले वासरु शंकराचा अवतार असल्याची भावना

चमत्कार झाल्याप्रमाणे तीन डोळ्यांचे वासरू जन्मल्याने गायीचे मालक असणारे शिवाजी देवकर अतिशय आनंदात आहेत. आपल्या घरी जणू भगवान शंकरानेच अवतार घेतलाय अशी त्यांची भावना आहे. त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि आसपासच्या परिसरातील नागरिक या चमत्कारी वासराच्या आगमनामुळे आनंदी झाले आहेत. शिवाजी शामराव देवकर, अनिल शामराव देवकर या वासराची काळजी घेत आहेत. सर्वांनाच हा शंकराचा अवतार असल्याचे वाटत आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुंबईची खबर: देशाची वॉटरफ्रंट राजधानी म्हणून मुंबई ओळखली जाणार! वांद्रेतील 140 जमिनीवर म्हाडाचा मेगा प्रोजेक्ट...

    follow whatsapp