नागपूर : क्रिकेट खेळताना अवघड जागेला बॅट लागली, 13 वर्षीय मुलाचा मृत्यू, महिनाभरापूर्वीच वडिलांचं झालं होतं निधन

मुंबई तक

17 Oct 2025 (अपडेटेड: 17 Oct 2025, 12:17 PM)

Nagpur News : नागपूरमध्ये 13 वर्षीय मुलाचा क्रिकेट खेळताना मृत्यू झालाय.

MumbaiTak
Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

क्रिकेट खेळताना 13 वर्षीय मुलाचा मृत्यू

point

महिनाभरापूर्वीच वडिलांचं झालं होतं निधन

Nagpur News : भिवापूर शहरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 13 वर्षांच्या मुलाचा क्रिकेट खेळताना झालेल्या अपघाती मृत्यूने सर्वत्र शोककळा पसरली आहे. गुरुवारी (दि. 16) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. प्रणव अनिल आगलावे (वय १३, रा. भिवापूर) असे या मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

हे वाचलं का?

अवघड जागेवर बॅट लागली, प्रणवचा जागेवर मृत्यू 

अधिकची माहिती अशी की, प्रणव हा स्थानिक राष्ट्रीय विद्यालयात इयत्ता सातवीत शिकत होता. दररोजप्रमाणेच गुरुवारी शाळा सुटल्यावर तो आपल्या मित्रांसोबत महाविद्यालयाच्या मैदानावर क्रिकेट खेळायला गेला होता. खेळ सुरू असतानाच अचानक त्याच्या अवघड जागेवर बॅट लागली. या तीव्र धक्क्याने प्रणव क्षणातच जमिनीवर कोसळला. मित्रांनी तात्काळ त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, पण त्याची हालचाल थांबलेली पाहून सर्वजण घाबरले. त्यांनी तातडीने मदतीसाठी आरडाओरड केली.

हेही वाचा : "मालकाच्या घरातून सामान उचलून नेणारे", NDA तील नेत्याची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका

महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत प्रणवला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने रुग्णालयात जमा झाले आणि वातावरण शोकमग्न झाले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

बॅट दोन पायांच्या मधोमध धरून दाबण्याचा प्रयत्न, पण अवघड जागेवर गंभीर इजा 

उपस्थित लोकांच्या माहितीनुसार, प्रणव खेळताना हातातील बॅट दोन पायांच्या मधोमध धरून दाबण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी अचानक झालेल्या आघाताने त्याच्या अवघड जागेवर गंभीर इजा झाली. या तीव्र वेदनेमुळे तो तात्काळ बेशुद्ध पडला आणि काही क्षणांतच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, महिनाभरापूर्वीच प्रणवच्या वडिलांचे निधन झाले होते. अजूनही त्या दुःखातून सावरायच्या आधीच नियतीने आईवर आणखी एक घाव केला आहे. एका आईचा आधार आणि एकुलता एक मुलगा क्षणात हिरावून घेतल्याने संपूर्ण भिवापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

जालना महापालिकेचा आयुक्त 10 लाखांची लाच घेताना सापडला, कंत्राटदारांचा आनंद गगनात मावेना; फटक्यांची माळ उडवली