जालना महापालिकेचा आयुक्त 10 लाखांची लाच घेताना सापडला, कंत्राटदारांचा आनंद गगनात मावेना; फटक्यांची माळ उडवली
Jalna News : जालना महापालिकेचा आयुक्त 10 लाखांची लाच घेताना सापडला, कंत्राटदारांचा आनंद गगनात मावेना; फटक्यांची माळ उडवली
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जालना महापालिकेचा आयुक्त 10 लाखांची लाच घेताना सापडला

कंत्राटदारांचा आनंद गगनात मावेना; फटक्यांची माळ उडवली
Jalna News : जालन्यात महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांना एका कंत्राटदाराकडून 10 लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल रंगेहात पकडलं. या कारवाईनंतर शहरातील कंत्राटदारांनी एसीबी कार्यालयासमोर फटाके फोडत जल्लोष केलाय. आयुक्त खांडेकर हे कंत्राटदारांचं कोणतंही काम पैशांशिवाय करत नाही, असा आरोप वारंवार होत होता. अखेर काल एसीबीच्या पथकाने खांडेकर यांना 10 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर एसीबीच्या या कारवाईचं कंत्राटदारांनी स्वागत करत एसीबी कार्यालया बाहेर फटाके फोडून कंत्राटदारांनी जल्लोष साजरा केलाय.
एसीबीच्या माहितीनुसार, आयुक्त खांडेकर यांनी ही लाच स्वीकारताच तक्रारदाराने ठरल्याप्रमाणे पथकाला मिसकॉल दिला. तत्काळ कारवाई करत एसीबीच्या अधिकाऱ्यांनी खांडेकर यांना पकडले. रात्री सुमारे 7.30 च्या सुमारास ही कारवाई पार पडली. जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष महादेव खांडेकर यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने गुरुवारी सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी रंगेहात अटक केली. कंत्राटदारांकडून चार कामांच्या बिलांसाठी एकूण 10 लाख रुपयांची मागणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
दरम्यान, या कारवाईची बातमी पसरताच जालना येथील काही कंत्राटदारांनी एसीबी कार्यालयासमोर फटाके फोडून कारवाईचे स्वागत केले. त्यांनी आयुक्तांविरोधात आपला रोष व्यक्त करत एसीबीचे आभार मानले. कंत्राटदारांचा आरोप आहे की, खांडेकर यांनी बांधकाम कामांचे बिल मंजूर करण्यासाठी दहा लाख रुपयांची लाच मागितली होती, ज्यामुळे त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली.