Kolhapur Crime : आई आणि मुलाच्या नात्यासारखं नातं या जगात कुठेच नसतं. पण, एका मुलाने आपल्याच आईच्या डोक्यात वरवंटा घालत संपवल्याचा लज्जास्पद आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलाने आपल्या आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले होते. आईने पैसे दिले नसल्याने लेकाने असं अमानुष कृत्य केलं आहे. ही घटना कोल्हापूरातील साळुंखे पार्क परिसरात घडली आहे. सावित्रीबाई अरुण निकम डवरी (वय 53) असे आईचे नाव आहे. तर निर्घृण कृत्य करणाऱ्या तरुणाचे नाव विजय निकम डवरी असे आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
ADVERTISEMENT
संबंधित तरुण विजय निकम डवरीचा विजापूर येथील एका तरुणीशी विवाह झाला होता, लग्नानंतर त्यांना दोन अपत्य झाली होती. तरुणाचा आणि पत्नीचा वारंवारच्या वादाला आणि पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून पत्नी भाग्यश्री गेल्या 10 वर्षांपूर्वी विजापूरला आपल्या माहेरी निघून गेली होती. तिला सद्या 15 आणि 17 वर्षाच्या 2 मुली आहेत. याच विजयने दारूच्या नशेत आपल्याच आईवर हल्ला केला आणि अनर्थ घडला होता.
हे ही वाचा : 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी ज्या घरात राहत होती त्याच नराधमाने... डोंबिवलीतील मुलीनं धाडस करत डोकं लावलं अन्...
आईच्या डोक्यात वरवंट्याने हल्ला
लेकानं आपल्याच आईचा खून केल्याचं परिसरातील लोकांना समजताच घटनास्थळी खळबळ माजली. या घटनेनंतर परिसरात अनेक लोकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. खून झालेल्या ठिकाणी पोलिसांच्या फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी आणि पंचनामा करण्यात आला होता. डोक्यात वरवंट्याने हल्ला केल्याने सावित्रीबाई जमिनीवर पडल्या, त्यानंतर त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊन मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला.
आईने पैसे देण्यास विरोध दर्शवला अन्...
बुधवारी सकाळी तरुण हा दारुच्या नशेत असताना त्याने आपल्या आईकडे पैशांची मागणी केली होती. आईने पैसे देण्यास विरोध दर्शवून त्याने घरातील वरवंटा डोक्यात घालून आईचा खून केला होता. त्यानंतर त्याने पळवाट न शोधता तो मृतदेहासोबत बराच वेळ बसून राहिला होता. त्याने केलेल्या अशा चुकीचा कृत्याचा त्याच्या चेहऱ्यावर कसलाही पश्चात्ताप नव्हता असे सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा : जालना जिल्ह्यातील पाझर तलावात दोघेही भाऊ पोहायला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने गटांगळ्या खात बुडून...
त्यानंतर त्यानेच इस्पुर्ली येथील बहिणीला फोनद्वारे संपर्क करत आईने खून केल्याची माहिती त्याने दिली. याच घटनेची माहिती त्याने शेजाऱ्यांनाही दिली असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनं कोल्हापूरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
