जालना जिल्ह्यातील पाझर तलावात दोघेही भाऊ पोहायला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने गटांगळ्या खात बुडून...
Jalna news : जालना जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जाफराबाद तहसील परिसरातील वाढोणा गावात पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जालना जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार

चुलत भाव पोहायाले गेले अन् परतलेच नाही
Jalna news : जालना जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जाफराबाद तहसील परिसरातील वाढोणा गावात पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आहे. या घटनेनं संपूर्ण गावात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
हे ही वाचा : मराठा आरक्षण टिकेल की नाही? बीडच्या मराठा बांधवाने उचललं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?
मृतांची नावे समोर
मृत विद्यार्थ्यांची नावे आता समोर आलेली आहे. ओम गणेश आढे (वय 11) आणि कुणाल कृष्णा आढे (वय 13) अशी नावे आता समोर आली आहेत. दोघेही चुलत भाऊ देऊळगांव राजा येथील एका विद्यालयात शिक्षण घेत होते. ओम हा इयत्ता पाचवी तर कुणाल हा इयत्ता सातवीत शिक्षण घेत होता.
पाण्याचा अंदाज न आल्यानं होत्याचं नव्हतं घडलं
मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही पाझर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. तलावाची खोली अधिक असल्याने मुलांचं पाण्यात संतुलन बिघडल्याचं दिसून आलं. हे सर्व सुरु असताना घटनास्थळी असणाऱ्या मुलांनी हे चित्र पाहिलं आणि आरडाओरड करण्यास सुरुवात केली होती.
हे ही वाचा : अर्धकेंद्र योगाचा 'या' राशींवर होणार चांगला परिणाम, काय सांगतं राशिभविष्य?
परिस्थिती पाहता ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तलावात उडी घेत लहान मुलांना बाहेर काढले होते. सांगण्यात येत आहे की, दोघांनाही टेंभुर्णीच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि पुढील चौकशी सुरु ठेवली. या धक्कादायक घटनेनं वाढोण गावात शोक व्यक्त केला जात आहे. संबंधित मुलाच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.