मराठा आरक्षण टिकेल की नाही? बीडच्या मराठा बांधवाने उचललं टोकाचं पाऊल, सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?
Maratha Reservation : मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधारे राज्य सरकारने आरक्षणाचं आश्वासन दिले आहे. तर दुसरीकडे ओबीसी बांधव याच आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक पावित्रा घेताना दिसत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बीडच्या मराठा बांधवाने उचललं टोकाचं

सुसाईड नोटमध्ये नेमकं काय लिहिलं?
Maratha Reservation : मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधारे राज्य सरकारने आरक्षणाचं आश्वासन दिले आहे. तर दुसरीकडे ओबीसी बांधव याच आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक पावित्रा घेताना दिसत आहेत. काही ओबीसी बांधवांनीही आत्महत्या केल्याच्या घटना ताजा असतानातच, आता मराठा बांधवांमधील आत्महत्येचं सत्र सुरुच असल्याचं बघायला मिळतं. बीड जिल्ह्यातील नाथापूर गावातील एका शेतकऱ्याने मराठा आरक्षण टिकेल की नाही? असा प्रश्न उपस्थित करत टोकाची भूमिका उचलली आहे. बाबुराव लक्ष्मण चव्हाण असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
हे ही वाचा : अर्धकेंद्र योगाचा 'या' राशींवर होणार चांगला परिणाम, काय सांगतं राशिभविष्य?
सुसाईड नोटमध्ये नेमकं काय लिहिलं?
बाबुराव लक्ष्मण चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोटही लिहिली होती. "मराठा आरक्षणाला सतत विरोध होतोय आणि अशात आरक्षण टिकेल की नाही माहीत नाही... त्यामुळे मी आत्महत्या करत आहे", अशा आशयाचा मजकूर चिठ्ठीत लिहिला होता. दरम्यान, बाबुराव चव्हाण यांची दोन्ही मुलं पदवीचे शिक्षण घेतायत.

अशात आरक्षणाच्या वाढत्या विरोधामुळे बाबुराव चव्हाण सतत अस्वस्थ होते. मुलांच्या भविष्याचे काय होईल या चिंतेपोटी त्यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकांनी केला. दरम्यान सुसाईड नोटची सत्यता पोलीस तपासत आहेत.
हे ही वाचा : देवेंद्र फडणवीसांसमोर आत्मसमर्पण करणारा नक्षलवादी कोण आहे? सरकारने ठेवलेलं 10 कोटींचं बक्षीस
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून मराठा आणि ओबीसी समाजातील अनेक बांधवांनी आत्महत्या करत जीवन संपवलं आहे. याच आरक्षणाच्या मागणीमुळे ओबीसी असेल किंवा मराठा बांधव असतील अशा लोकांना आपली जीव गमवावा लागला आहे.