कामवाल्या बाईने खेळण्यातली बंदूक दाखवून मालकीणीला लुटलं अन् लाखो रुपये घेऊन फरार...
एका वृद्ध महिलेला तिच्याच घरातील मोलकरणीने खेळण्यातील बंदूक दाखवून तब्बल 5 लाख रुपये लुटल्याची वृत्त समोर आलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

खेळण्यातली बंदूक दाखवून मालकीणीला लुटलं

कामवाली बाई लाखो रुपये घेऊन फरार...
Crime News: सध्या, चोरी, घरफोडी, दरोडा अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतंय. अशा प्रकरणांमध्ये बऱ्याचदा आरोपी भयानक पद्धतीने पीडितांना धमकावतात आणि त्यांच्याजवळील किंवा घरातील रोख रक्कम, दागिने यांची चोरी करून फरार होतात. अशी एक बातमी समोर आली आहे. एका वृद्ध महिलेला तिच्याच घरातील मोलकरणीने खेळण्यातील बंदूक दाखवून तब्बल 5 लाख रुपये लुटल्याची वृत्त समोर आलं आहे. ही घटना दिल्लीच्या रंजीत नगर परिसरात एका वृद्ध महिलेच्या घरात घडली.
नातेवाईकासोबत मिळून आखली योजना
या प्रकरणात घरातील कामवाल्या बाईसह पाच लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. शुक्रवारी (17 ऑक्टोबर) पोलिसांनी या प्रकरणाबाबत बोलताना सांगितलं. संबंधित प्रकरण हे दिल्लीतील रंजीत नगर परिसरातील असल्याचं सांगण्यात येत आहे. या आरोपींमध्ये मोनू उर्फ विकास राठी तसेच अक्षय आणि मोलकरणीचा नातेवाईक कैलाश उर्फ गंजू यांचा समावेश आहे. खरंतर, कैलाश हा आरोपी महिलेचा जवळचा नातेवाईक असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा: तीन पुरुष, एक महिला अन् मुंबईचा 'तो' फ्लॅट... अपहरणाची 'ही' कहाणी वाचून तर हादरूनच जाल
दरवाजा उघडा दिसताच आरोपी आत घुसले अन्...
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलाशने त्याला पैशांची गरज असल्याचं मोलकरणीला सांगितलं होतं. त्यानंतर, दोघांनी मिळून घरमालकीणीकडून पैसे लुबाडण्याची योजना आखली. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली की, पाच ऑक्टोबर रोजी मालकीण, मोलकरीण आणि एक दुसरी महिला त्या घरात होत्या. दरम्यान, घराचा दरवाजा उघडा दिसताच आरोपी आत घुसले.
हे ही वाचा: फरफटत वॉशरूममध्ये नेलं अन्... कॉलेजमध्येच विद्यार्थीनीवर बलात्कार! नंतर आरोपी फोन करुन म्हणाला की...
पोलिसांचा तपास
त्या आरोपींनी खेळण्यातील बंदूक दाखवून तिन्ही महिलांना धमकावलं आणि त्यांना बाथरूममध्ये बंद केलं. त्यावेळी आरोपी त्या घरातून पाच लाख रुपये घेऊन फरार झाले. प्रकरणातील आरोपी अक्षयवर यापूर्वी सुद्धा बरेच गुन्हे दाखल असून त्यामध्ये गँगस्टर अॅक्ट, शस्त्रांचा वापर आणि हत्येचा प्रयत्न अशा गुव्ह्यांचा समावेश आहे.