अंधार पडलाय म्हणून रात्री घरी राहिले अन् मावसबहिणींवर केला बलात्कार; हादरवून टाकणारं प्रकरण
Crime News : एका 22 वर्षीय विवाहित महिलेवर आणि तिच्या 17 वर्षीय अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेचा पती कामानिमित्त गुजरातमध्ये असतो, त्यामुळे आपल्या लहान मुलीच्या देखभालीसाठी तिने अल्पवयीन बहिणीला सोबत ठेवले होते. याचाच फायदा घेत महिलेचा मावस भाऊ आणि त्याच्या मित्राने या दोघींना आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यांच्यावर अत्याचार केले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अंधार पडलाय म्हणून रात्री घरी राहिले अन् मावसबहिणींवर केला बलात्कार
हादरवून टाकणारं प्रकरण
Crime News : एका 22 वर्षीय विवाहित महिलेवर आणि तिच्या 17 वर्षीय अल्पवयीन बहिणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेचा पती कामानिमित्त गुजरातमध्ये असतो, त्यामुळे आपल्या लहान मुलीच्या देखभालीसाठी तिने अल्पवयीन बहिणीला सोबत ठेवले होते. याचाच फायदा घेत महिलेचा मावस भाऊ आणि त्याच्या मित्राने या दोघींना आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यांच्यावर अत्याचार केले. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर मधील ही घटना आहे.
हे ही वाचा : घरात सकारात्मक ऊर्जा टिकवायची आहे? मग कपाटावरच्या वस्तूंकडे दुर्लक्ष करू नका; वाढू शकते आर्थिक चणचण!
जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार
दोघी पीडित बहिणी मंदिरातून परतत असताना अंधार झाल्यामुळे त्यांच्या मावस भावाने आणि अमन खान नावाच्या त्याच्या मित्राने त्यांना घरी सोडतो असे सांगितले. रात्री उशीर झाल्याचे कारण सांगून ते दोघेही पीडितेच्या घरी थांबले. रात्रीच्या वेळी दोन्ही नराधमांनी या बहिणींना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्यावर बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे, आरोपी मावस भावाने यापूर्वीही पीडित महिलेसोबत अत्याचार केला होता, मात्र भीतीपोटी तिने तेव्हा कोणालाही काही सांगितले नव्हते.
लग्नाचे अमिष दाखवले
अत्याचार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपींनी लग्नाचे आमिष दाखवून दोघींनाही सोबत घेतले. रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यावर प्रवासासाठी आणि राहण्या-खाण्यासाठी पैसे नसल्याचे नाटक करत आरोपी मावस भावाने पीडितेकडून 40 हजार रुपये रोख आणि चांदीचे जोडवे हडपले. त्यानंतर दोघींनाही तिथेच सोडून मावसभाऊ आपल्या मित्रासह पसार झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित महिला जेव्हा मावशीच्या घरी चौकशीसाठी गेली, तेव्हा तिथेही आरोपी सापडला नाही.










