घरात सकारात्मक ऊर्जा टिकवायची आहे? मग कपाटावरच्या वस्तूंकडे दुर्लक्ष करू नका; वाढू शकते आर्थिक चणचण!

मुंबई तक

Vastushastra : आपल्या घरातील कपाट किंवा तिजोरी हे फक्त वस्तू ठेवण्याचे साधन नसून ते घराची ऊर्जा आणि सुख-समृद्धीचे प्रतीक देखील आहे. आपण याचा वापर कपडे, पैसा आणि मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी करतो. मात्र अनेकदा जागेच्या कमतरतेमुळे किंवा सोयीसाठी आपण त्याच्यावर पुस्तके, जुने कपडे, डबे आणि अनावश्यक सामान ठेवून देतो. पण तुम्हाला माहितीये का? याचा आपल्या घरावर नकारात्मक परिणाम होतो. जर तुमच्या घरात सतत अस्वस्थपणा जाणवत असेल किंवा सतत आजारपण येत असेल तर यामागे कपाटावर ठेवलेले हे सामान कारणीभूत असू शकते. 

ADVERTISEMENT

vastushastra
vastushastra
google news

बातम्या हायलाइट

point

घरात सकारात्मक ऊर्जा टिकवायची आहे?

point

मग कपाटावरच्या वस्तूंकडे दुर्लक्ष करू नका

point

वाढू शकते आर्थिक चणचण!

Vastushastra : आपल्या घरातील कपाट किंवा तिजोरी हे फक्त वस्तू ठेवण्याचे साधन नसून ते घराची ऊर्जा आणि सुख-समृद्धीचे प्रतीक देखील आहे. आपण याचा वापर कपडे, पैसा आणि मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी करतो. मात्र अनेकदा जागेच्या कमतरतेमुळे किंवा सोयीसाठी आपण त्याच्यावर पुस्तके, जुने कपडे, डबे आणि अनावश्यक सामान ठेवून देतो. पण तुम्हाला माहितीये का? याचा आपल्या घरावर नकारात्मक परिणाम होतो. जर तुमच्या घरात सतत अस्वस्थपणा जाणवत असेल किंवा सतत आजारपण येत असेल तर यामागे कपाटावर ठेवलेले हे सामान कारणीभूत असू शकते. 

हे ही वाचा : अजित पवार यांच्या जागी आमदार कोण? बारामती विधानसभेची पोटनिवडणूक कधी लागणार? तयारी सुरु

याबाबतीत वास्तूशास्त्र काय सांगते?

वास्तू शास्त्रानुसार ही सवय घरातील सकारात्मक ऊर्जेवर परिणाम करते आणि हळूहळू यातून अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. कपाटाचा वरचा भाग जड आणि अस्ताव्यस्त झाल्याने घरातील वातावरण त्रासदायक बनते. घरात राहणाऱ्या व्यक्तींना अनेकदा अस्वस्थता, तणाव आणि निर्णय घेताना गोंधळ जाणवतो. याचा परिणाम केवळ मानसिक स्तरावरच नाही तर शारीरिक आरोग्यावरही होतो. अशा घरांमध्ये छोटी-मोठी आजारपणे सतत मागे लागलेली असतात. तसेच घराच्या प्रमुखासह सर्व सदस्यांच्या दिनचर्येवरही याचा परिणाम होतो.

घरात पैसा टिकत नाही

यातून एक महत्त्वाची समस्या निर्माण होते. ज्यामुळे मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. घरात येणाऱ्या पैशावर याचा मोठा परिणाम होतो. घरात पैसे तर येतात, पण ते टिकत नाहीत आणि अनावश्यक खर्च वाढतात. वास्तू शास्त्रात सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी मातेची अशा घरांवर अवकृपा होते. ती अप्रसन्न होते. यामुळे घराची समृद्धी मंदावते. मात्र यावर वास्तू शास्त्रामध्ये उपायही सांगितला आहे. चला तर, त्या उपायाविषयी जाणून घेऊया.

हे वाचलं का?