तीन पुरुष, एक महिला अन् मुंबईचा 'तो' फ्लॅट... अपहरणाची 'ही' कहाणी वाचून तर हादरूनच जाल

पीडित व्यावसायिकाला एका फ्लॅटमध्ये बंदिस्त ठेवून बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याच्याकडून तब्बल 80 लाख रुपये वसूल करण्यात आले.

तीन पुरुष, एक महिला अन् मुंबईचा 'तो' फ्लॅट...

तीन पुरुष, एक महिला अन् मुंबईचा 'तो' फ्लॅट...

मुंबई तक

• 12:59 PM • 18 Oct 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईतील फ्लॅटमध्ये केलं अपहरण अन्...

point

आरोपींनी बेदम मारहाण करत सगळंच लुटलं

Mumbai Crime: मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे तीन पुरुष आणि एका महिलेने मिळून एका व्यावसायिकाचं अपहरण केल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर, पीडित व्यावसायिकाला एका फ्लॅटमध्ये बंदिस्त ठेवून बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याच्याकडून तब्बल 80 लाख रुपये वसूल करण्यात आले. नेमकं प्रकरण काय? सविस्तर जाणून घ्या. 

हे वाचलं का?

बळजबरीने कारमध्ये टाकलं अन्...

14 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी, नेहमीप्रमाणे दक्षिण मुंबईतील लोकमान्य टिळक मार्गाच्या जुन्या हनुमान गल्लीत एक व्यावसायिक त्याच्या बिल्डिंग खाली उभा होता. एजन्सीच्या माहितीनुसार, त्यावेळी त्या व्यावसायिकाच्या समोर अचानक कार येऊन थांबते. त्यानंतर, त्या कारमधून तीन पुरुष आणि एक महिला खाली उतरतात. लगेच, त्यया चारही लोकांनी पीडित व्यक्तीला बळजबरीने गाडीत टाकलं आणि सेंट्रल मुंबईच्या परळ परिसराच्या दिशेने कार वेगाने जात होती. 

सोन्याच्या व्यवहारातून झाला वाद 

परळमधील एका फ्लॅटमध्ये पोहोचल्यानंतर चौघांनी त्या व्यावसायिकावर हल्ला केला. त्याला बेदम मारहाण करत एका जुन्या सोन्याच्या डीलबद्दल आरोपी त्याची चौकशी करू लागले. सोन्याच्या व्यवहारातून हा वाद निर्माण झाला होता. अपहरण आणि मारहाण करून या सगळ्याचा आरोपी बदला घेत होते. 

हे ही वाचा: फरफटत वॉशरूममध्ये नेलं अन्... कॉलेजमध्येच विद्यार्थीनीवर बलात्कार! नंतर आरोपी फोन करुन म्हणाला की...

लाखो रुपयांचं सोनं अन् रोख पैसे सुद्धा...

बरेच तास पीडित व्यवसायिकाला त्या फ्लॅटमध्ये बांधून ठेवण्यात आलं होतं. इतकेच नव्हे तर, त्याचा खिसा, मोबाईल आणि  UPI सुद्धा आरोपींनी तपासले. त्याच्याकडून आरोपींनी जवळपास 76.23 लाख रुपये किंमतीचं 591 सोनं हिसकावून घेतलं. याव्यतिरिक्त, 2.99 लाख रुपयांचा चेक आणि 15,000 रुपये UPI ट्रान्सफर करून घेतले. 

हे ही वाचा: पैसे परत करण्याच्या बहाण्याने शेतात बोलवलं अन् महिलेचा गळा दाबून निर्घृण हत्या! अखेर, 8 दिवसांनंतर...

सोने आणि रोख मिळाल्यानंतर, चारही आरोपींनी पीडित व्यवसायिकाला सोडून दिलं. त्यानंतर, पीडित व्यक्तीने थेट एल.टी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. त्यानंतर, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आणि लवकरच याचा शोध घेण्यात आला. अटक केलेल्या आरोपींमध्ये नवी मुंबईतील ज्वेलर्स तारक मैती (35) आणि रघुनाथ मैती (34) यांचा समावेश आहे. तसेच दीपक महाडिक (45) हा शिवडी येथील डॉग ट्रेनर असल्याची माहिती आहे. तसेच, आरोपी महिला ही दीपकची पत्नी अलका महाडिक असून त्यांच्यासोबत राहुल दिवे आणि सुनील गोराई या तरुणांचा देखील समावेश होता. सर्व आरोपींना 18 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्याकडून सोने आणि इतर वस्तू देखील जप्त करण्यात आल्या आहेत.

    follow whatsapp