Govt Job: कोणत्याही परीक्षेशिवाय बँकेत क्लर्क आणि ऑफिसरची नोकरी मिळवण्याची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. इंडियन बँकेकडून स्पोर्ट्सपर्सन उमेदवारांसाठी नवी भरती जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना खेळात रस आहे आणि ज्यांनी क्रीडा क्षेत्रात प्राविण्य प्राप्त केलं आहे, अशा उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 4 फेब्रुवारी 2026 असून इच्छुक आणि पात्र उमेदवार 24 फेब्रुवारी 2026 पर्यंत अर्ज करू शकतात.
ADVERTISEMENT
या पदांवर नियुक्त होण्यासाठी उमेदवारांसाठी कोणत्याही लेखी परीक्षेचं आयोजन केलं जाणार नाही. स्क्रीनिंग, स्पोर्ट्स ट्रायल आणि मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम indianbank.bank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
काय आहे पात्रता?
ऑफिसर JMG स्केल-I: या पदासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता असणं आवश्यक आहे. यासोबतच, भरतीच्या अटीप्रमाणे उमेदवाराने क्रीडा क्षेत्रात देशाचं प्रतिनिधित्व केलेलं असावं.
क्लर्क: या पदासाठी देखील उमेदवारांनी 10 वी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. यासोबतच, स्टेट ज्युनियर नॅशनल/ नॅशनल खेळांमध्ये राज्याचं प्रतिनिधित्व केलेलं असावं किंवा संयुक्त विद्यापीठ संघाचा सदस्य असावा किंवा आंतर-विद्यापीठ स्पर्धेत पहिल्या 3 मध्ये स्थान मिळवले असेल किंवा जिल्हा संघात भाग घेतला असावा.
हे ही वाचा: तीन वर्षांपासून मुस्लिम तरुणीसोबत अफेअर पण, शेवटी घडलं भयानक अन् रेल्वे ट्रॅकवर तुकड्यांमध्ये तरुणाचा मृतदेह...
कसा कराल अर्ज?
1. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम indianbank.bank.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
2. आता Current Openings सेक्शनमध्ये Recruitment Of Sportsperson for FY 2025-26 या टॅबवरील Click Here for New Registration लिंकवर क्लिक करा.
3. त्यानंतर, https://ibpsreg.ibps.in/ या वेबसाइटवर री-डायरेक्ट व्हाल.
4. रजिस्ट्रेशनच्या कॉलममध्ये नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी अशी महत्त्वाची माहिती भरून रजिस्ट्रेशन नंबर तयार करून घ्या.
5. पासवर्डच्या माध्यमातून वेबसाइटवर लॉगिन करा आणि अर्जात उर्वरित माहिती भरा.
6. शेवटी, अर्जाचं शुल्क भरून फॉर्मची प्रिंटआउट काढून घ्या.
भरतीसंबंधी अधिक माहिती मिळवण्यासाठी बँकेच्या अधिकृत वेबसाइट तपासण्याचा सल्ला दिला जात आहे.
ADVERTISEMENT











