राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त खास व्याख्यानमाला, मोहन भागवत काय काय म्हणाले?

Mohan Bhagwat : संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेत भविष्यातील दिशा, सामाजिक जबाबदाऱ्या आणि बदलत्या काळातील संघाची भूमिका यावर मोहन भागवत यांनी सविस्तर विचार मांडले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने या व्याख्यानासाठी उपस्थित होते.

Mohan Bhagvat

Mohan Bhagvat

मुंबई तक

08 Feb 2026 (अपडेटेड: 08 Feb 2026, 03:01 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त खास व्याख्यानमाला

point

मोहन भागवत काय काय म्हणाले?

Mohan Bhagwat Speech, मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत दोन दिवसीय व्याख्यानमालेचे  आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय व्याख्यानमालेच्या दुसऱ्या दिवशी ‘संघाचा 100 वर्षांचा प्रवास – नवी क्षितिजे’ या विषयावर महत्त्वपूर्ण सत्र पार पडले. वरळी येथील नेहरू सेंटर सभागृहात आज (दि.8) सकाळी 10.30 वाजता झालेल्या या सत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मार्गदर्शन केले. संघाच्या शंभर वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेत भविष्यातील दिशा, सामाजिक जबाबदाऱ्या आणि बदलत्या काळातील संघाची भूमिका यावर त्यांनी सविस्तर विचार मांडले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, स्वयंसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने या व्याख्यानासाठी उपस्थित होते. दरम्यान, यावेळी मोहन भागवत यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी सविस्तरपणे सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहे. त्यांना कोणकोणते प्रश्न विचारण्यात आले? आणि त्यांनी कोणती उत्तरे दिली सविस्तर जाणून घेऊयात..... 

हे वाचलं का?

समाजात RSS बाबत अनेक भ्रम आहेत. ते कसे दूर करता येतील? संघाचे स्वयंसेवक कोणत्याही परिस्थितीत कसे काम करतात? शाखेतील कामाच्या स्वरुपात वेळेनुसार बदल आणावेत असं वाटतं का? नव्या पिढीसाठी संघाच्या कामात इंग्रजी भाषेचा समावेश केला जावा का? 

मोहन भागवत म्हणाले, परिस्थिती अनुकूल किंवा प्रतिकुल असतेच. परिस्थितीचा जास्त विचार करुन फायदा नाही. आपण उपाय काय आहेत? याचा विचार केला पाहिजे. स्वयंसेवक अशा पद्धतीने विचार करतो. इकडं असं झालं. तिकडं तसं झालं, समोर अडचणी आहेत, पुढे अडचणी आहेत, असा विचार करुन काहीच फायदा नाही. परिस्थिती कशी आहे? हे पाहून मी यामध्ये काय करु शकतो. याचा विचार करायला हवा. संघाचे स्वयंसेवक असाच विचार करतात. जिथे विरोध होता, तिथेही त्यांनी सुरुवात केली. हळूहळू काम उभं करता आलं. त्यांनी परिस्थितीचा विचार केला नाही. नवं काम असेल तर लोकांच्या मनात भ्रम असतात. भ्रम पसरवले देखील जातात. संघाबाबत असं अनेकदा घडलंय. परंतु हे भ्रम तोपर्यंत चालतात, जोपर्यंत सत्य समोर येत नाही. 'जोवरी जोवरी जंबूक करी गर्जना l जवं त्या पंचानना देखिले नाही' असं ज्ञानेश्वर महाराज म्हणाले होते. जोपर्यंत वाघ समोर येत नाही. तोपर्यंत ते ओरडत असतात. सत्य समोर आल्यानंतर भ्रम दूर होतात. आपलं काम संस्कारांचं आहे, प्रचाराचं नाही. त्यामुळे प्रचारच्या क्षेत्रात आम्ही मागे राहिलोय. प्रचार करताना प्रचार करणाऱ्यांवरही काही परिणाम होतात.. प्रचार केला तर प्रसिद्धी वाढते. प्रसिद्धी वाढली तर अहंकार वाढतो. सार्वजनिक जीवनात यापासून बचाव करणे आवश्यक असतं. प्रसिद्धी कमी झाली तरी खराब आहे, जास्त झाली तरी खराब आहे. प्रचार कार्याचा करावा, व्यक्तीचा नाही. ज्याठिकाणी जेवढं आवश्यक त्याठिकाणी तेवढा करावा. असं आपलं काम सुरु आहे, त्यामुळे आपण थोडे मागे आहोत. एका प्रतिष्ठित मासिकाचे संपादक आहेत. ते संघाचे कडवे विरोधक होते. मला भेटायला आले. मी त्यांना जे सर्वांना सांगतो तेच सांगितलं. तरी देखील त्यांचे अनेक प्रश्न कायम होते. मी त्यांना नागपूरच्या तृतीय वर्ष वर्गात दोन दिवस राहाण्यासाठी बोलवले. एक सोडला तर त्यांचे सगळे प्रश्न मिटले. तो प्रश्न अजूनही कायम आहे, सांगितल्यानंतरही विश्वास होत नाही. संघाकडे पैसा कुठून येतो? हा तो प्रश्न आहे. मी त्यांना सांगतो की, संघ चालवण्यासाठी स्वयंसेवक गुरुदक्षिणा देतात. सेवा देण्यासाठी समाजातून मदत घेतो. मात्र, त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यांचा हा प्रश्न सोडला तरी बाकीच्या प्रश्नांची उत्तरे त्यांना मिळाली. संघात येऊन पाहा संघ कसा आहे? असं मी नेहमी आवाहन करतो. तुमचे प्रश्न कायम राहतील. मात्र, एक चमचा साखर खाल्ल्यानंतर साखर गोड आहे, हे सांगण्याची आवश्यकता राहात नाही. 

पुढे बोलताना मोहन भागवत म्हणाले, इंग्रजी भाषा संघाच्या कामाची पद्धतीत कधीच येणार नाही. कारण ती भारतीय भाषा नाही. आपल्याला भारतीय लोकांमध्ये काम करायचं आहे. हिंदी मातृभाषा आहे, असं म्हणत आपण इंग्रजीमध्ये बोलू शकतो. मात्र, त्याने मातृभाषा बदलत नाही. परंतु जिथे इंग्रजी आवश्यक आहे, तिथं आम्ही त्याचा वापर करतो. भाषेशी आपलं भांडण नाही. आम्ही आहोत, तेच आम्हाला राहायचंय. इंग्रजी अशी बोलायला हवी की, इंग्लंडचे लोक तिकिट काढून आपलं भाषण ऐकायला यायला हवेत. अशी इंग्रजी आपल्याला यायला हवी. जिथे इंग्रजीशिवाय आपलं काम करता येणार नाही, तिथं आम्ही इंग्रजी बोलतो. मात्र, आम्ही संघाचं काम इंग्रजीत करणार नाहीत. संघात भारतीय भाषाच चालेल. 

संघामध्ये पदाधिकाऱ्याची निवृत्ती कशाच्या आधारे केली जाते? SC, ST समाजातील व्यक्ती सरसंघचालक बनू शकतो का? 

मोहन भागवत म्हणाले, संघाचे जनरल सेक्रेटरी आहेत. दत्ताजी होसबाळे हे सध्या ते काम पाहात आहेत. क्षेत्राचे, जिल्ह्यांचे आणि विभागांचे संघचालक याची तीन वर्षातून एकदा निवडणूक होते. यांना निवड करणारा तो सुद्धा स्वयंसेवकांकडून निवडला जातो. 50 स्वयंसेवकांमागे 1 असे प्रांत प्रतिनिधी असतात. 40 प्रांत प्रतिनिधीमागे 1 अखिल भारतीय प्रतिनिधी असतो. अखिल भारतीय प्रतिनिधी सरकार्यवाहक आणि क्षेत्र संघचालकांची निवड करतात. त्यांच्यासोबत प्रांतनिधी हे प्रांत, जिल्हा संघचालकांची निवड करतात. बाकी सर्व लोकांची नियुक्ती हे लोक करतात. अपवाद फक्त सरसंघचालकांचा आहे. सरसंघचालक पुढील सरसंघचालकाची निवड करतो. ते श्रद्धेचं स्थान मानलं जातं, तिथे निवडणूक वगैरे होत नाही. त्या पदावर असलेल्या व्यक्तीवर लोकं श्रद्धा ठेवतात. तो व्यक्तीचा मान नाही, पदाचा मान आहे. नियुक्ती अशा पद्धतीने होते, निवृत्ती कधीही होऊ शकते. कामापासून आयुष्यात कधीही निवृत्ती होत नाही. शेवटच्या श्वासापर्यंत काम करणारे लोक देखील आहेत. जोपर्यंत शरीर काम करतं तोपर्यंत लोक काम करतात. मात्र, वयाची 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर बंधनाशिवाय काम करायला हवं. संघाकडून अनुमती असेल तर वेगळी गोष्ट आहे. जसा मी आहे, माझं वय 75 पूर्ण आहे. मी कार्यकर्त्यांना म्हणालो, माझा झालं आत.. ते म्हणाले, तुम्हाला काय झालंय? फिरत तर आहात. आणखी काम करा. त्यामुळे मी थांबलोय. मी इथं राहावं हा संघाने दिलेला पर्याय आहे, माझा नाही. शिवाय कोणाला निवृत्त करावे लागले, अशी वेळ अजून आलेली नाही. ती येऊ नये अशी इच्छा आहे. संघाचा सरसंघचालक कोण बनावे? कोणी ब्राह्मण संघाचा सरसंघचालक बनू शकत नाही. क्षत्रिय, वैश्य, शूद्र बनू शकत नाही. जो हिंदू आहे, तोच बनेल. सरसंघचालक SC, ST समाजातील असला तरी बनू शकतो. आणखी कोणी असेल तरी बनू शकतो. असं काही पाहून आमच्याकडे कार्यकर्त्यांची नियुक्ती होत नाही. जो काम करेल तो होऊ शकतो. पूर्वी संघ छोटा होता. एका वसाहतीत संघाचं काम सुरु झालं. ती ब्राह्मण वसाहत होती. त्यामुळे कधीकाळी संघाचे सगळे पदाधिकारी ब्राह्मण होते. तेव्हा लोकं म्हणत होते की, संघ ब्राह्मणांचा आहे. कारण लोक आपले किती आहेत? हेच पाहातात. मात्र, आता संघाचं काम वाढलंय. आम्ही संघाची वाढ कोणत्या जाती-पातीत करत नाही. भौगोलिक क्षेत्रात करतो. आम्ही त्याप्रमाणे वाढलो तर सगळ्या वसाहती संपर्कात येतात. त्यामुळे पुढील काळात SC, ST समाजातील व्यक्ती सरसंघचालक होणार की नाही? याचं उत्तर मी देऊ शकत नाही. कारण ज्याला करायचं आहे, तो विचार करेल. मला पुढील निवडायचा असेल तेव्हा मी विचार करेन. मी विचार करेल की योग्य कोण आहे? तो सर्वांसाठी उपलब्ध असेल का? SC, ST समाजातील असणे, हे अपात्र असल्याप्रमाणे नाही. किंवा ब्राह्मण असणे म्हणजे पात्र आहात, असंही नाही. 

मुस्लीम समाजाकडे जाणारे स्वयंसेवक विरोध असताना काम कसं करतात? 

एखाद्या गोष्टीला तुम्ही विरोध केला आणि मी देखील विरोध केला तर विरोध सुरुच राहणार आहे. तथागत गौतम बुद्धांना एकाने प्रचंड त्रास दिला. मात्र, ते शांत होते. मग तो व्यक्ती म्हणाला, मी इतकं तुम्हाला बोलत आहे. ,तुम्हाला राग का येत नाही? उत्तर देताना दे म्हणाले, मी तुम्हाला एखादी वस्तू दिली आणि तुम्ही घेतली नाही. तर ती वस्तू कोणाकडे राहिल? तो म्हणाला तुमच्याकडेच राहिल. त्याच पद्धतीने तुम्ही एवढ्या शिव्या दिल्या. मात्र, मी त्या घेतल्याच नाहीत. राग येण्याचं कारणच नाही. काम करण्यासाठी गेलेले स्वयंसेवक सगळ्या गोष्टींची तयारी करतात. विरोध करणारे देखील आपलेच आहेत, हे त्यांना माहिती असतं. पहिल्यांदा आमच्यावर निर्बंध होते. खोटे आरोप करुन बंदी आणली. खूप अन्याय झाला. मात्र, निर्बंध हटवण्यात आल्यानंतर पूज्यनीय गुरुजींनी भाष्य केलं होतं. ते म्हणाले, चुकून दातांमध्ये जीभ येते आणि कापली जाते. त्यामुळे कोणी आपले दात तोडून टाकत नाही. जे झालं ते झालं. आपलाच समाज आहे. आणिबाणीनंतर पूज्यनीय बाळासाहेब म्हणाले, forget and forgive ..कारण कोणीही असलं तरी समाज आपला आहे. त्यामुळे आम्ही याची चिंता करत नाहीत. सुरुवातीला लोकांना समजतं तेव्हा फार विरोध होतो. मारहाण होते, शिवीगाळ केली जाते. मात्र, जेव्हा हे लक्षात येतं की आपल्याकडून भरपूर झालं. मात्र, यांनी काहीच घेतलं नाही. मग ते आपलं बोलणं ऐकतात. ऐकल्यानंतर ते पडताळून पाहातात. पडताळून पाहिल्यानंतर ते म्हणतात यांच्यामध्ये काहीतरी दम आहे. थोडं यांच्या जवळ गेलं पाहिजे. असं करत करत ते आमचे बनतात. ही आमची प्रक्रिया आहे. असचं आम्ही सगळीकडे काम करतो. स्वयंसेवक मुस्लिमांकडे काहीतरी काम करत आहेत. ते असंच काम करतात. 
 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

चक्क हॉटेलमध्ये सापडल्या मतदान पेट्या, अधिकारी म्हणाला, माझी चूक झाली!; सोलापुरात राष्ट्रवादी आक्रमक
 

    follow whatsapp