मुंबईची खबर: तासांऐवजी मिनिटांत धार्मिक दर्शन! शिर्डी, भीमाशंकर, अजिंठा-वेरूळ अशा स्थळांना हेलिकॉप्टर कनेक्टिव्हिटी

राज्य पर्यटन विभाग राज्यातील सर्व धार्मिक आणि वारसा स्थळांदरम्यान हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे. विभागाच्या या उपक्रमामुळे पर्यटकांचा प्रवास तासांऐवजी मिनिटांपर्यंत कमी होईल.

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:44 PM • 07 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

तासांऐवजी मिनिटांत धार्मिक दर्शन!

point

शिर्डी, भीमाशंकर, अजिंठा-वेरूळ स्थळांना हेलिकॉप्टर कनेक्टिव्हिटी

Mumbai News: महाराष्ट्रातील धार्मिक आणि वारसा स्थळांना भेट देणं आता लवर. राज्य पर्यटन विभाग राज्यातील सर्व धार्मिक आणि वारसा स्थळांदरम्यान हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याची योजना आखत आहे. विभागाच्या या उपक्रमामुळे पर्यटकांचा प्रवास तासांऐवजी मिनिटांपर्यंत कमी होईल. पर्यटन विभागाचे संचालक डॉ. बी.एन. पाटील यांच्या मते, शिर्डी, नाशिक, भीमाशंकर, अजिंठा, वेरूळ आणि राज्यातील इतर प्रमुख पर्यटन स्थळांवर हेलिपॅड विकसित करण्याची योजना आहे. यातील काही ठिकाणी हेलिपॅड आधीच बांधण्यात आले आहेत. 

हे वाचलं का?

राज्यात 75 नमो सेंटर... 

डॉ. पाटील यांच्या माहितीनुसार, राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या दरवर्षी 15 टक्क्यांनी वाढत आहे. पर्यटकांना चांगल्या सुविधा देऊन दरवर्षी त्यांची संख्या 20 ते 25 टक्क्यांनी वाढवण्याची योजना आहे. पर्यटनस्थळावर लोकांना उत्तम मार्गदर्शन करण्यासाठी राज्यात 75 नमो सेंटर उभारले गेले आहेत. लवकरच राज्यात आणखी नमो सेंटर तयार केले जातील. 

हे ही वाचा: Zilla Parishad Election 2026 LIVE: राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू... पाहा, मतदानाची LIVE टक्केवारी

वेळेसोबत इंधनाची सुद्धा बचत करा... 

राज्यात येणारे पर्यटक रस्ते मार्गाने प्रवास करतात आणि ठिकाणांमधील अंतर जास्त असल्याकारणाने त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचण्यासाठी बऱ्यादा 4 ते 6 तास किंवा त्याहूनही जास्त वेळ लागतो. हेलीकॉप्टरच्या सुविधेमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक वेगवान होईल आणि वेळेसोबत इंधनाची देखील बचत होईल. आता प्रवास अधिक सोयीस्कर आणि सोप्पा करण्यासाठी पर्यटन विभागाने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी योजना आखली आहे. 

    follow whatsapp