धावत्या ट्रेनखाली झोपून स्टंट! व्हायरल व्हिडीओ पाहून बसेल धक्का; RPF आणि पोलीस करणार कठोर कारवाई

केवळ रील बनवण्यासाठी एक तरुण चक्क धावत्या ट्रेनच्या खाली आडवा झाला. सुदैवाने, या घटनेत तरुणाला काहीच दुखापत झाली नसली ही तरी घटना कायद्याचं उल्लंघन करणारी आहे.

धावत्या ट्रेनखाली झोपून स्टंट!

धावत्या ट्रेनखाली झोपून स्टंट!

मुंबई तक

• 07:00 AM • 08 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

धावत्या ट्रेनखाली झोपून तरुणाचा स्टंट!

point

RPF आणि पोलीस करणार कठोर कारवाई

point

व्हायरल व्हिडीओ पाहून बसेल धक्का

Viral Story: सोशल मीडियावर प्रसिद्धीझोतात येण्यासाठी लोक आपल्या जीवाची देखील पर्वा करत नसल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच, असा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओ पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. केवळ रील बनवण्यासाठी एक तरुण चक्क धावत्या ट्रेनच्या खाली आडवा झाला. सुदैवाने, या घटनेत तरुणाला काहीच दुखापत झाली नसली ही तरी घटना कायद्याचं उल्लंघन करणारी आहे. रेल्वे रूळांवरून ट्रेन गेल्यानंतर, तो तरुण उभा राहिला आणि जणू काही त्याने एखादी लढाईच जिंकली आहे, असा हसला. हैदराबादचे पोलीस आयुक्त व्ही.सी. सज्जनार यांनी हे कृत्य केवळ 'मूर्खपणाचा कळस' असल्याचं सांगितलं. तसेच, अधिकाऱ्यांनी असंही सांगितलं की फक्त एका सेकंदाच्या विलंबामुळे हा स्टंट मृत्यूच्या सापळ्यात बदलू शकला असता. आता, रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि पोलीस अशा विचित्र लोकांविरुद्ध झीरो टॉलरन्स धोरण स्वीकारत आहेत. प्रशासनाने आता त्या तरुणाविरुद्ध कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. 

हे वाचलं का?

व्हायरल व्हिडीओत काय दिसतंय? 

व्हायरल व्हिडीओत दिसत आहे की, एक तरुण रेल्वे रूळाच्या मधोमध झोपतो आणि ट्रेन अतिशय वेगाने त्याच्यावरून जाते. ती ट्रेन आणि तरुणाचं शरीर यामधील अंतर खूपच कमी असतं आणि ट्रेन रूळांवरून गेल्यानंतर तो सुरक्षितरित्या उभा राहतो. संबंधित तरुणाचा मित्र देखील तिथे उपस्थित असतो आणि तोच ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद करतो. 

हे ही वाचा: उद्धव ठाकरेंच्या आमदारासाठी एकनाथ शिंदेंनी घेतली प्रचार सभा, राज्यात मोठ्या घडामोडी; नेमकं काय घडलं?

पोलीस अधिकाऱ्यांनी या व्हिडीओवर तीव्र आक्षेप व्यक्त केला. ते म्हणाले की, सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या नादात केलेलं हे कृत्य निव्वळ मूर्खपणा आहे. त्यांनी तरुणांना जबाबदार आणि काळजीपूर्वक राहण्याचं आवाहन केलं आहे. या व्हिडीओवर त्यांनी स्पष्ट केलं की सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणं अतिशय चुकीचं कृत्य आहे. 

या व्हिडीओबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं की, अशाप्रकारचे स्टंट रेल्वे 1989 च्या रेल्वे कायदा अंतर्गत दंडनीय गुन्हे आहेत. नुकतंच, मऊ येथील एका तरुणाविरुद्ध अशाच प्रकारची रील बनवल्याबद्दल चौकशी सुरू करण्यात आली. जानेवारी 2026 मध्ये काही तरुणांनी वंदे भारत एक्सप्रेस थांबवण्यासाठी रुळांवर लाकडे ठेवली होती. रेल्वे पोलिस आता अशा प्रकरणांमध्ये थेट अटक आणि त्यांच्या तुरुंगवासाच्या तयारीत आहेत. 

    follow whatsapp