लग्नाचा वाढदिवस असल्याने संपूर्ण कुटुंब केक घेऊन रात्रभर वाट पाहत बसलं, पहाटे मुलाचा मृतदेहच घराकडे आला!

Delhi Accident News : घरात सगळे जण मध्यरात्री केक कापण्याची तयारी करत होते. मात्र अर्धा तास उलटूनही कमल घरी पोहोचला नाही. फोनही बंद झाला. काळजीने कुटुंब अस्वस्थ झालं. त्यानंतर सुरू झाली अखंड शोधमोहीम. आधी कमलच्या ऑफिसमध्ये धाव घेतली. तेथून तो निघून गेल्याचं सांगण्यात आलं. मग एकामागून एक पोलीस ठाण्यांचे दरवाजे ठोठावले. रस्तोरस्ती त्याच्या दुचाकीचा शोध घेतला. संपूर्ण रात्र कुटुंब रस्त्यावर भटकत राहिलं. पण कुठलाही धागा मिळाला नाही.

Delhi Accident News

Delhi Accident News

मुंबई तक

07 Feb 2026 (अपडेटेड: 07 Feb 2026, 02:55 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

लग्नाचा वाढदिवस असल्याने संपूर्ण कुटुंब केक घेऊन रात्रभर वाट पाहत बसलं

point

पहाटे मुलाचा मृतदेहच घराकडे आला!

Delhi Accident News : मुलाचा लग्नाचा वाढदिवस असल्याने दिल्लीतील एक कुटुंब केक घेऊन बसलं आणि त्याच्या येण्याची वाट पाहात होतं. त्यांनी लग्नाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मेनबत्त्या देखील पेटवल्या होत्या. जेवणाची ताट मांडायलाही सुरुवात करणार होते. मात्र, हा आनंदाचा क्षणाचा विचार सुरु असताना कुटुंबियांसाठी ती रात्र सर्वात भयावह बनून आली. कारण कमल ध्यानी या 25 वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाला आणि संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. 

हे वाचलं का?

कमल हा कॉल सेंटरमध्ये काम करणारा तरुण. शुक्रवारी रात्री 12.50 वाजता त्याने आपल्या जुळ्या भावाला करणला फोन करून सांगितलं की, “15 मिनिटांत घरी पोहोचतोय. आईला जेवण बनवायला सांग.” घरात सगळे जण मध्यरात्री केक कापण्याची तयारी करत होते. मात्र अर्धा तास उलटूनही कमल घरी पोहोचला नाही. फोनही बंद झाला. काळजीने कुटुंब अस्वस्थ झालं. त्यानंतर सुरू झाली अखंड शोधमोहीम. आधी कमलच्या ऑफिसमध्ये धाव घेतली. तेथून तो निघून गेल्याचं सांगण्यात आलं. मग एकामागून एक पोलीस ठाण्यांचे दरवाजे ठोठावले. रस्तोरस्ती त्याच्या दुचाकीचा शोध घेतला. संपूर्ण रात्र कुटुंब रस्त्यावर भटकत राहिलं. पण कुठलाही धागा मिळाला नाही.

दरम्यान, पहाटे पोलिसांचा फोन आला. कमलचा मृतदेह सापडल्याचं सांगण्यात आलं. जनकपुरी परिसरात दिल्ली जल बोर्डाच्या सांडपाणी पाइपलाइनच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या सुमारे 15 फूट खोल खड्ड्यात त्याचा मृतदेह आणि चिखलात अडकलेली दुचाकी आढळली. अपघाताच्या वेळी कमलच्या डोक्यावर हेल्मेट होतं. ही दुचाकी त्याने स्वतःच्या बचतीतून खरेदी केली होती.

हेही वाचा : मंदिरात एकटी आल्याचं पाहिलं, अन् 3 तरुण 'दिल ना दिया' म्हणत मागे लागले; शेवटी तरुणीने काय केलं? पाहा VIDEO

कमलचा मित्र मयंक म्हणाला, “कमलला त्याची बाईक खूप आवडायची. साधा, कष्टाळू मुलगा होता. कुणाशी भांडण नाही, फक्त कुटुंबासाठी मेहनत.” कमलच्या घरच्यांसाठी ही बातमी वादळासारखी होती. “आईला आम्ही उशिरा सांगितलं. वडील रात्रभर शोधत होते. सकाळी त्यांना मुलाचा गुंडाळलेला मृतदेह पाहावा लागला,” 

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार हा अपघात होणारच होता. रस्त्यावर पुरेशी लाईट नव्हती. खड्ड्याभोवती कोणतेही बॅरिकेड्स, जाळी किंवा सुरक्षितता साधनं नव्हती. काही रहिवाशांनी सांगितलं की रस्ता टप्प्याटप्प्याने बंद करण्यात आल्याने वाहनचालक गोंधळात पडत होते. अंधारामुळे रात्री हा भाग जवळपास दिसेनासा होत होता.

कमल कैलाशपुरी येथे कुटुंबासोबत राहत होता. वडील आणि मोठा भाऊ पुजारी आहेत. जुळा भाऊ करण सीए परीक्षेची तयारी करतो. आई गृहिणी आहे. “तो स्वतःसाठी फारसा खर्च करत नसे. पालकांची काळजी घ्यायची, हेच त्याचं स्वप्न होतं,” असं त्याचे मित्र सांगतात. कुटुंबीयांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केली असून जलद तपासाची अपेक्षा व्यक्त केली आहे. पोलिसांनी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून तीन अभियंत्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

पत्नीच्या कॅन्सरच्या उपचारांचा खर्च कसा भागवायचा? आर्थिक विवंचनेत अडकलेल्या नवऱ्याने बायकोला सुपारी देऊन संपवलं
 

    follow whatsapp