Health Tips: तुम्हालाही जेवल्यानंतर लगेच झोप किंवा आळस जाणवतो का? आणि विशेषत: दुपारच्या वेळेतच असं होतं का? मात्र, ही बाब गृहीत धरू नका. डॉक्टरांच्या मते, आठवड्यातून एक किंवा दोनदा जेवण झाल्यानंतर लगेच झोप येणं सहाजिक आहे, परंतु जर हे दररोज घडत असेल तर तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं. कारण दररोज जेवल्यानंतर लगेच झोप येणे हे आरोग्याच्या एखाद्या समस्येचं लक्षण असू शकतं.
ADVERTISEMENT
यामागची काय कारणे असू शकतात?
दिल्लीतील एम्स येथील सीनिअर रेजिडेंट डॉ. हिमांशू भदानी यांनी याबाबतीत स्पष्ट केलं की जेवण झाल्यानंतर शरीरातील रक्त प्रवाह म्हणजेच ब्लड फ्लो पोटाकडे सरकतो. त्यामुळे मेंदूकडे जाणारा रक्त प्रवाह थोडा कमी होतो. यामुळे काही मिनिटांसाठी झोप किंवा सुस्ती येऊ शकते. जर एखादी व्यक्ती दररोज भात, ब्रेड, बटाटे आणि मिठाई खात असेल तर त्यांना झोप येऊ शकते. आहारात जास्त कार्बोहायड्रेट्स आणि परिणामी साखरेची पातळी वाढल्यामुळे ही समस्या उद्भवते.
डॉक्टरांच्या मते, अधिक प्रमाणात खाल्ल्याने देखील झोपेची समस्या होते. याचाच अर्थ, जास्त खाण्यामुळे शरीरातील पचनसंस्थेवर दबाव येतो, ज्यामुळे शरीराला ऊर्जा वाचवावी लागते आणि काही काळासाठी विश्रांती घ्यावी लागते.
मेडिकल टेस्ट करण्याचा सल्ला
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर झोपेची ही समस्या अधूनमधून होत असेल, जसे की आठवड्यातून एकदा किंवा दोनदा, तर काहीच हरकत नाही. पण, जर ते वारंवार म्हणजेच दररोज घडत असेल, तर ते मधुमेह किंवा हायपोथायरॉईडीझम सारख्या काही विशिष्ट आजारांचं लक्षण असू शकतं. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजी राहू नका. दररोज जेवल्यानंतर तुम्हाला झोप येत आहे का? विशेषतः, हलक्या जेवणानंतर देखील तुम्हाला झोप येते का? याचा विचार करा आणि जर असं घडत असेल तर मेडिकल टेस्ट करून घ्या.
ही समस्या टाळण्यासाठी काय करावे?
1. घाईघाईत जेवू नका. हळूहळू जेवण करा.
2. जास्त गोड पदार्थ खाऊ नका.
3. जेवणात अधिक प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करा.
ADVERTISEMENT











