8 वी आणि 10 वी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! भारतीय सैन्यात 'अग्निवीर' बनण्याची सुवर्णसंधी; 'असा' करा अर्ज

भारतीय सैन्य दलात सेवा करण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026 ची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.

Agniveer Bharti 2026

Agniveer Bharti 2026

मुंबई तक

• 11:20 AM • 03 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

8 वी आणि 10 वी पास उमेदवारांसाठी आनंदाची बातमी!

point

भारतीय सैन्यात 'अग्निवीर' बनण्याची सुवर्णसंधी

point

'असा' करा अर्ज

Agniveer Bharti 2026 : भारतीय सैन्य दलात सेवा करण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय सैन्य अग्निवीर भरती 2026 ची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. यामध्ये अग्निवीर जनरल ड्यूटी (GD), टेक्निकल, लिपिक/स्टोअर कीपर आणि ट्रेड्समन (8 वी व 10 वी उत्तीर्ण) अशा विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. देशसेवेची ओढ असलेल्या युवकांसाठी ही एक मोठी संधी चालून आली आहे.

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

या भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता पदांनुसार निश्चित करण्यात आली आहे. जनरल ड्यूटी पदासाठी उमेदवाराने किमान 45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. टेक्निकल पदासाठी 12 वी उत्तीर्ण (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि इंग्रजी विषयासह) किंवा 10 वी उत्तीर्णतेसोबत ITI/डिप्लोमा धारक उमेदवार पात्र असतील. तसेच, ट्रेड्समन पदासाठी 8 वी आणि 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना स्वतंत्रपणे अर्ज करता येणार आहे.

हे ही वाचा : गर्लफ्रेंड मामाच्या मुलासोबत फिरत होती, सगळं पाहून बॉयफ्रेंडच्या डोक्यात तिडीक गेली, अन् पुढे भयंकर घडलं!

'या' ठिकाणी होणार भरती

वयोमर्यादेबाबत विशेष लक्ष देणे गरजेचे आहे; ज्या उमेदवारांचा जन्म 1 जुलै 2005 ते 1 जुलै 2009 या दरम्यान झालेला आहे, तेच या भरतीसाठी पात्र ठरतील. महाराष्ट्रातील पुणे, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), कोल्हापूर, नागपूर आणि मुंबई अशा विविध सैन्य भरती कार्यालयांच्या (ARO) अंतर्गत हे भरती मेळावे आयोजित केले जाणार आहेत. निवड झालेल्या अग्निवीरांना संपूर्ण भारतात कोठेही नियुक्ती दिली जाऊ शकते.

हे ही वाचा : मुंबईची खबर : रिक्षाने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना फटका, 8 एप्रिल रोजी रिक्षाचालकांचा संप; नेमकं कारण काय?

ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

इच्छुक उमेदवारांनी 250 रुपये परीक्षा शुल्क भरून अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2026 असून, शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी उमेदवारांनी वेळेत नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमुळे हजारो तरुणांना भारतीय लष्कराचा भाग होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.