Maharashtra Weather : राज्यात पुन्हा धो धो बरसणार पाऊस, 'या' जिल्ह्यांचं काही खरं नाही... हवामानाचा अलर्ट

मुंबई तक

• 05:00 AM • 03 Apr 2026

Maharashtra Weather : राज्यात सध्या काही ठिकाणी उष्ण - दमट, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. जाणून घेऊयात 3 मार्च 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात अवकाळी पावसाचं थैमान

point

काही भागात पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra Weather : राज्यात सध्या अवकाळी पावसानं थैमान घातलं आहे. वातावरणाची परिस्थिती पाहता, हवामान विभागाने काही ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी केलाय. यामुळे राज्यात सध्या काही ठिकाणी उष्ण - दमट, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. जाणून घेऊयात 3 मार्च 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सुनेला रात्री 12 वाजता विधीसाठी केली जबरदस्ती, सर्वच पुरुष नग्नावस्थेत, सासऱ्याने तिच्या उघड्या अंगावर...

कोकण 

कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबईमध्ये हवामान विभागाने हलक्या पावसाचा अलर्ट जारी केला. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हवामान विभागाने विजांच्या कडरडाटासह हलक्या पावसाचा अलर्ट जारी केला. 

मध्य महाराष्ट्र 

मध्य महाराष्ट्रातील धुळे, नाशिक, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यांत हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला. नंदुरबार, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यात हवामान विभागाने वि‍जांसह पावसाचा अलर्ट जारी केला. अहिल्यानगर, जळगाव या दोन जिल्ह्यांत हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. 

मराठवाडा 

मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली तसेच नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती या जिल्ह्यांत हवामान विभागाचा यलो अलर्ट जारी केला. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'त्या' एका कारणामुळे 68 लाख लाडक्या बहि‍णींची खाती बंद, नेमकं काय घडलं?

विदर्भ 

विदर्भातील बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ या जिल्ह्यांत हवामान विभागाने पावसाचा यलो अलर्ट जारी केला. वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात हवामान विभागाने कसलाही अंदाज जारी केला नाही.