डोंबिवलीत पुजाऱ्याचं विकृत कृत्य, घरात कोणीही नसताना 5 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

मिथिलेश गुप्ता

• 07:34 PM • 02 Apr 2026

Dombivali crime : डोंबिवलीतील गोग्रासवाडी परिसरात एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर एका पाच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. या धक्कादायक घटनेनं परिसर हादरून गेल्याचे कृत्य केले आहे. या प्रकरणात पुजारी हरीश भावेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. संबंधित घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र आहे.

Dombivali crime

Dombivali crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

ओळखीचा गैरफायदा घेत पुजाऱ्याचं विकृत कृत्य

point

पीडितेनं कुटुंबियांना सांगितला घटनेचा थरार

Dombivali Crime : डोंबिवलीतील गोग्रासवाडी परिसरात एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर एका पाच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केला. या धक्कादायक घटनेनं परिसर हादरून गेला आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी पुजारी हरीश भावे या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. अशोक खरात या भोंदूबाबामुळे आता अशा घटना समोर येऊ लागल्या आहेत. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सुनेला रात्री 12 वाजता विधीसाठी केली जबरदस्ती, सर्वच पुरुष नग्नावस्थेत, सासऱ्याने तिच्या उघड्या अंगावर...

ओळखीचा गैरफायदा घेत पुजाऱ्याचं विकृत कृत्य

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हरीश भावे हा ग्रोग्रासवाडी परिसरात घरोघरी जाऊन पूजा-अर्चना केली. पीडित मुलीचे आई-वडील हे  मजुरीसाठी दिवसभर घराबाहेरच असतात. संबंधित परिस्थितीचा फायदा घेत आरोपीने निष्पाप मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला. आरोपी हा पीडित कुटुंबाच्या घराशेजारी राहत असल्याने त्याचे घरात सतत ये-जा सुरु असायचे. ओळखीचा गैरफायदा घेत नराधमाने 15 मार्च ते 1 एप्रिल महिन्यादरम्यान वारंवार हे कृत्य केल्याचे समोर आले.  

हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : पुणे शहराला अवकाळी पावसाने झोडपलं, रस्त्यांना नदी-नाल्याचे स्वरुप, नागरिकांची उडाली दाणादण 

पीडितेनं कुटुंबियांना सांगितला घटनेचा थरार

दरम्यान, चिमुरडीने धैर्य दाखवत तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. घटनेची बाब समजताच पालकांना मोठा धक्का बसला, नंतर त्यांनी तात्काळपणे टिळकनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून भारतीय न्यायसंहिता 74, 76 कलमान्वये पॉक्सो 2012 कायद्यांतर्गत कलम 8 व 12 नुसार, गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनं परिसर हादरून गेले आहे. संबंधित प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी नागरिकांकडून मागणी करण्यात आली आहे.