Maharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाचं सावट, 'या' जिल्ह्यात वादळी वार्‍यासह घालणार धुमाकूळ

मुंबई तक

• 05:00 AM • 02 Apr 2026

Maharashtra Weather : राज्यात मार्च महिन्याप्रमाणे एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाचं सावट आहे, जाणून घ्या  2 एप्रिल रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज.

Maharashtra Weather

Maharashtra Weather

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राज्यात मार्च महिन्याप्रमाणे एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाचं सावट

point

2 एप्रिल रोजी हवामान विभागाचा एकूण अंदाज

Maharashtra Weather : राज्यात मार्च महिन्यासह आता एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाचं सावट आहे. 2 एप्रिल रोजी हवामान विभागाने राज्यातील 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे 23 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. जाणून घेऊयात 2 एप्रिल 2026 रोजी हवामान विभागाचा एकूण अंदाज.

हे वाचलं का?

हे ही वाचा : पुण्याची गोष्ट : पुण्यातून बाहेर पडण्यासाठी 3 महत्त्वाच्या महामार्गांवरील टोलचा दर वाढला, नवे दर आले समोर

कोकण 

कोकण विभागात मुंबई, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता जारी केली. ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या तीन जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट जारी केला. तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांच्या पावसाचा अंदाज जारी केला आहे. 

पश्चिम महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे शहराला अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. तसेच काही भागांत पावसासह वेगाने वारे वाहण्याची अधिक शक्यता आहे. तर कोल्हापूरात रिमझिम पाऊस पडेल असा अंदाज आहे. तसेच सांगली, सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला. तसेच काही विभागात गारपीट होण्याची संभावना आहे. 

मराठवाडा 

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीडमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे, या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तसेच लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला.

हे ही वाचा : कौटुंबिक वादातून सुनेनं सासऱ्याच्या अवघड जागेवर लाथ मारली, एका झटक्यात गेला जीव

विदर्भ 

विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, बुलढाणा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा अलर्ट जारी केला आहे.