Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण! BSNL मध्ये इंजिनिअर्ससाठी मोठी संधी; जाणून घ्या सविस्तर

इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. BSNL मध्ये बीई, बीटेक पास उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.

Government Job

Government Job

मुंबई तक

• 01:51 PM • 02 Apr 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण

point

BSNL मध्ये इंजिनिअर्ससाठी मोठी संधी

point

जाणून घ्या सविस्तर

Govt Jobs : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने 2026 सालासाठी वरिष्ठ एक्झिक्युटिव ट्रेनी पदांच्या भरतीची अधिकृत घोषणा केली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 120 रिक्त जागा भरल्या जाणार असून, यामध्ये टेलिकॉम स्ट्रीमसाठी 95 जागा आणि फायनान्स स्ट्रीमसाठी 25 जागांचा समावेश आहे. सरकारी क्षेत्रात उज्ज्वल भविष्य घडवू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

हे वाचलं का?

शैक्षणिक पात्रता

पात्रतेच्या निकषांनुसार, टेलिकॉम स्ट्रीमसाठी उमेदवाराकडे किमान 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, कॉम्प्युटर सायन्स, आयटी, इलेक्ट्रिकल किंवा इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये B.E. किंवा B.Tech पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, फायनान्स स्ट्रीमसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे CA किंवा CMA ही व्यावसायिक पदवी असणे अनिवार्य आहे. तांत्रिक आणि आर्थिक क्षेत्रात रस असणाऱ्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी मानली जात आहे.

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana : 'त्या' एका कारणामुळे 68 लाख लाडक्या बहि‍णींची खाती बंद, नेमकं काय घडलं?

वयोमर्यादा आणि शुल्क

वयोमर्यादेचा विचार करता, 7 मार्च 2026 रोजी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षांच्या दरम्यान असावे. नियमानुसार, SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षे आणि OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सवलत देण्यात आली आहे. अर्जासाठी सर्वसाधारण, OBC आणि EWS वर्गासाठी 2,500 रुपये शुल्क असून, SC/ST आणि दिव्यांग उमेदवारांसाठी 1,250 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही नियुक्ती दिली जाऊ शकते.

हे ही वाचा : Personal Finance: बँकेच्या FD पेक्षा जास्त पैसा देणाऱ्या 'या' आहेत जबरदस्त सरकारी योजना

'ही' आहे शेवटची तारीख

इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अधिकृत संकेतस्थळावर जाऊन 15 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करणे आवश्यक आहे. शेवटच्या क्षणी होणारी गर्दी आणि तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी उमेदवारांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमुळे दूरसंचार क्षेत्रात नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.