पैसे परत करण्याच्या बहाण्याने शेतात बोलवलं अन् महिलेचा गळा दाबून निर्घृण हत्या! अखेर, 8 दिवसांनंतर...

मुंबई तक

एका निर्जन शेतात महिलेचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी केवळ आठ दिवसांतच या ब्लाइंड मर्डर प्रकरणातील आरोपीचा शोध घेतल्याचं सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

महिलेचा गळा दाबून निर्घृण हत्या!
महिलेचा गळा दाबून निर्घृण हत्या!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पैसे परत करण्याच्या बहाण्याने शेतात बोलवलं अन्...

point

महिलेचा गळा दाबून निर्घृण हत्या!

Crime News: काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या प्रतापगढ जिल्ह्यातील शेतात एका महिलेचा मृतदेह आढळला होता. या हत्याप्रकरणात पोलिसांनी आता मोठा खुलासा केल्याची बातमी समोर आली आहे. पोलिसांनी केवळ आठ दिवसांतच या ब्लाइंड मर्डर प्रकरणातील आरोपीचा शोध घेतल्याचं सांगितलं जात आहे. येथील खेरोट आणि विराचली दरम्यान एका निर्जन शेतात महिलेचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती. मृत महिलेच्या गळ्याला रूमाल बांधलेला होता आणि गळा आवळूनच तिची हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालं. संबंधित महिलेचं नाव सपना मीणा असल्याची माहिती आहे. याप्रकरणी, सपनाच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून यासंदर्भात तपास सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. 

आरोपीने केला गुन्हा कबूल 

पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण सोडवण्यासाठी पोलिसांची एक टीम तयार केली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान, पोलिसांनी 500 हून अधिक सीसीटीव्ही फूटेज तपासले आणि टेक्निकल तपासाच्या आधारे संशयित आरोपींचा शोध घेण्यास सुरूवात केली. अखेर, पोलिसांना तपासादरम्यान एक महत्त्वाचा पुरावा सापडला आणि घंटाली येथील रहिवासी बालुराम मीणा अशी आरोपीची ओळख समोर आली. पोलिसांनी या आरोपीला अटक केली आणि त्याची कठोर चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान, आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला. 

हे ही वाचा: बाप-लेक एकत्रच बसले दारू प्यायला, थोड्याच वेळात लेकानं बापालाच संपवलं; कारण…

महिलेकडून पैसे उधार घेतले होते...

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने सांगितलं की, तो आर्थिक अडचणीत होता आणि त्याच काळात, त्याने सपना मीणा नावाच्या महिलेकडून पैसे उधार घेतले होते. आरोपीने सपनाचे दागिने गहाण ठेवले आणि त्यातून मिळालेले पैसे लंपास केले होते. मात्र, सपनाने तिचे पैसे आरोपीकडे परत मागितले तेव्हा बालुरामने तिच्या हत्येचा कट रचला. आरोपीने सपनाला पैसे परत करण्याच्या बहाण्याने तिला निर्जन शेतात बोलवलं आणि तिथेच गळा दाबून तिची हत्या केली. महिलेच्या हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. 

हे ही वाचा: भारतातील 'ही' सर्वात महागडी अभिनेत्री, दीपिका-करिना जवळपासही नाहीत.. कोण आहे ती?

पीडितेजवळ मोबाईल फोन नसल्यामुळे तिच्या हत्येचं प्रकरण सोडवणं खूप अवघड होतं. मात्र, पोलिसांनी टेक्निकल पुरावे आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे प्रकरण सोडवलं. या प्रकरणासंदर्भात पोलिसांनी आरोपीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून हत्येशी संबंधित बऱ्याच बाबींचा शोध घेतला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp