भारतातील 'ही' सर्वात महागडी अभिनेत्री, दीपिका-करिना जवळपासही नाहीत.. कोण आहे ती?
Indias highest paid actress : भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री, दीपिका-करिना आसपास पण नाहीत, प्रत्येक सिनेमामागे कमावते 30 कोटी
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भारतातील सर्वात महागडी अभिनेत्री

दीपिका-करिना आसपास पण नाहीत
Indias highest paid actress : बॉलिवूडमधील कलाकारांचे मानधन हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. अभिनेते आणि अभिनेत्री आपापले मानधन गुप्त ठेवण्याचा प्रयत्न करतात, मात्र कधी ना कधी त्यांच्या मानधनाची माहिती बाहेर येतेच. काही वेळा बातम्यांमधून किंवा अफवांमधूनही हे उघड होते. पुरुष कलाकार एका चित्रपटासाठी शंभर कोटींहून अधिक रक्कम घेतात, पण महिला कलाकारदेखील आता त्यांच्याशी स्पर्धा करताना दिसत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, सध्या भारतातील सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आहे, जी एका चित्रपटासाठी तब्बल 30 कोटी रुपये घेते. विशेष म्हणजे, गेल्या सहा वर्षांपासून तिचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही.
भारतातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री
प्रियांका चोप्रा लवकरच एस.एस. राजामौली यांच्या आगामी चित्रपटातून पुनरागमन करणार आहे, ज्यामध्ये महेश बाबू मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे प्रियांका तब्बल 20 वर्षांनंतर दाक्षिणात्य सिनेमात परत येणार आहे. बॉलीवूड हंगामाच्या माहितीनुसार, प्रियांकाने या चित्रपटासाठी 30 कोटी रुपये घेतले असून, हे आतापर्यंतच्या कोणत्याही भारतीय अभिनेत्रीने घेतलेल्या मानधनापेक्षा जास्त आहे.
असे सांगितले जाते की, प्रियांकाने एवढी मोठी रक्कम मागितल्यामुळेच तिच्या भूमिकेबाबत अंतिम निर्णय घेण्यात वेळ लागला. तिने तिच्या मानधनात कोणतीही तडजोड केली नाही. दरम्यान, “आम्ही आमचं मानधन कमी का घ्यावं? पुरुष कलाकारांना दुप्पट पैसे का दिले जातात?” असा प्रश्न अनेक अभिनेत्री विचारताना दिसतात.