गरोदर महिला तपासणीसाठी डॉक्टरांकडे गेली, पण अल्ट्रासाउंड करताना डॉक्टरचे अश्लील कृत्य... प्रकरण थेट पोलिसात

मुंबई तक

एक महिला डॉक्टरांकडे आरोग्याची तपासणी करायला गेली असता डॉक्टरांनी तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे.

ADVERTISEMENT

अल्ट्रासाउंड करताना डॉक्टरचे अश्लील कृत्य...
अल्ट्रासाउंड करताना डॉक्टरचे अश्लील कृत्य...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गरोदर महिलेसोबत डॉक्टरचे अश्लील कृत्ये

point

प्रकरण थेट पोलिसात...

Crime News: एक महिला डॉक्टरांकडे आरोग्याची तपासणी करायला गेली असता डॉक्टरांनी तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपी डॉक्टर गिरीश वर्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, आरोपी सध्या फरार असल्याची माहिती आहे. संबंधित घटना ही भिलाईच्या सुपेला नेहरू नगर येथे घडली. 

डॉक्टरांनी अल्ट्रासाउंड करण्यास सुरूवात केली

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री जवळपास आठ वाजताच्या सुमारास एक नऊ महिन्यांची गरोदर महिला तिच्या पतीसोबत अल्ट्रासाउंड करण्यासाठी गेली होती. त्यावेळी, आधी एका नर्सने संबंधित महिलेची तपासणी केली आणि त्यानंतर आरोग्य तपासणीसाठी डॉ. वर्मा तिथे पोहोचले. तपासणीदरम्यान, डॉक्टरने नर्सला बाहेर जाण्यास सांगितलं आणि त्यानंतर त्याने तिचं अल्ट्रासाउंड करण्यास सुरूवात केली. 

महिलेसोबत अश्लील कृत्ये करू लागला

महिलेच्या आरोपानुसार, तो डॉक्टर विकृत मानसिकतेने पीडित महिलेसोबत अश्लील कृत्ये करू लागला. त्यावेळी पीडिता घाबरली आणि त्या डॉक्टरला विरोध करू शकली नाही. मात्र, खोलीतून बाहेर पडल्यानंतर तिने आरोपी डॉक्टरच्या घाणेरड्या कृत्याबद्दल पतीला सांगितलं. घटनेनंतर, पीडित महिला तिच्या पतीसोबत थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि तिने घडलेल्या घटनेबाबत तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता आरोपी डॉक्टरचा शोध घेत आहेत. 

हे ही वाचा: कामवाल्या बाईने खेळण्यातली बंदूक दाखवून मालकीणीला लुटलं अन् लाखो रुपये घेऊन फरार...

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भारतीय दंड संहितेच्या कलम  74, 75(1)(2), 79 अंतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गर्भवती महिलेला घटनास्थळी नेण्यात आलं. तिथे तिची व्हिडीओग्राफीसह देखील चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी तिला दुर्ग येथे नेलं आणि तिथे कलम 64 अंतर्गत तिचं रेकॉर्डिंग करण्यात आलं. नंतर, तिला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं गेलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp