Mumbai News: मुंबईला देशाची वॉटरफ्रंट राजधानी म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने म्हाडाचे विशेष प्रयत्न सुरू असल्याची बातमी समोर आली आहे. या दिशेने महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) आता एक मोठे पाऊल उचलणार असल्याचं सांगितलं जात आहे. म्हाडाकडून वांद्रे रिक्लेमेशनजवळील सुमारे 140 एकर जमीन वॉटरफ्रंट म्हणून विकसित केली जाईल. म्हाडाच्या या महत्त्वपूर्ण प्रोजेक्टला 'वांद्रे बे' असं नाव देण्यात आलं आहे. माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी या प्रोजेक्टसंदर्भात रिपोर्ट जारी केला आहे.
ADVERTISEMENT
'वांद्रे बे'चं प्रमुख वैशिष्ट्य
लाईटहाउस लग्झरी आणि सीआरई मॅट्रिक्सच्या रिपोर्ट्सनुसार, वांद्रे बे परिसरात जवळपास 80 लाख वर्क फूट प्रीमियम रेसिडेन्शिअल म्हणजेच निवासी आणि किरकोळ जागा विकसित केली जाईल. उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी हेच या क्षेत्राचं वैशिष्ट्य आहे. कोस्टल रोड, वांद्रे-वरळी सी लिंक, बुलेट ट्रेन, बीकेसी आणि हायवेशी कनेक्ट असल्याकारणाने 'वांद्रे बे'च्या विकासाला चालना मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
हे ही वाचा: Govt Job: सीमा सुरक्षा दलात सहभागी होण्यासाठी आत्ताच करा अर्ज... 'या' पदांसाठी निघाली भरती!
'वांद्रे बे'च्या विकासाला मिळणार चालना
म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयसवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लस्टर योजनेअंतर्गत 'वांद्रे बे'चं नियोजन केलं जात आहे. या ठिकाणी नागरिकांना केवळ घरेच दिली जाणार नाहीत तर रहिवाशांना सर्व प्रकारच्या सुविधाही पुरविल्या जातील. हिरानंदानी ग्रुपचे चेअरमन डॉ. निरंजन हिरानंदानी यांच्या म्हणण्यानुसार, कनेक्टिव्हिटी असल्याकारणाने हे ठिकाण अतिशय महत्त्वपूर्ण आहे.
हे ही वाचा: देवेंद्र फडणवीसांची अजितदादांवर कुरघोडी, सोलापुरातील राष्ट्रवादीचे 3 माजी आमदार भाजपने गळाला कसे लावले?
सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध...
हा परिसर मुंबईचा पुढील प्रीमिअम परिसर असल्याचं सांगण्यात येत आहे. सीआरई मॅट्रिक्सचे सीईओ अभिषेक गुप्ता यांच्या मते, मर्यादित पुरवठा, वाढती मागणी आणि उत्तम पायाभूत सुविधा म्हणजेच इन्फ्रास्ट्रक्चर यामुळे येथे गुंतवणूक करणं खूप फायदेशीर ठरेल. क्लस्टर योजनेअंतर्गत, स्थानिक रहिवाशांना मोफत घरे दिली जातील. तसेच, उर्वरित जमीन खाजगी कंपन्यांमार्फत विकसित करण्याचं नियोजन आहे.
ADVERTISEMENT
