Mumbai Crime: मुंबईच्या वांद्रे परिसरात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. येथील पोलिसांनी अमेरिकेत पीएचडीचं शिक्षण घेणाऱ्या एका 29 वर्षीय तरुणाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. आरोपी तरुणाने त्याच्यासोबतच शिकणाऱ्या एका 31 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचं सांगितलं जात आहे. पीडितेने संबंधित तरुणाविरुद्ध तक्रार दाखल करताना सांगितलं की, आरोपीने तिला लग्नाचं आश्वासन देऊन तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं. इतकेच नव्हे तर, या कृत्यानंतर कोणालाही याबाबत सांगितल्यास जीने मारून टाकण्याची धमकी सुद्धा दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तरुणाने पीडितेला अभ्यास करण्याच्या बहाण्याने वांद्रे येथील एका हॉटेलमध्ये बोलवलं आणि त्यानंतर, तिच्यावर बलात्कार केला.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिली माहिती
वांद्रे पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी लोअर परळ येथील रहिवासी असून पीडित तरुणी ही माहिममध्ये राहते. आरोपीचे वडील हे एका खाजगी बँकमध्ये मोठ्या पदावर कार्यरत असल्याची माहिती आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार, हे प्रकरण 1 जानेवारी ते 12 जून दरम्यान दोघे अमेरिकेत राहत असताना आणि नंतर, वांद्रे येथील एका आलिशान हॉटेलमध्ये घडलं.
हे ही वाचा: भामट्यांनी 18 खात्यांमधून तब्बल 58 कोटी रुपये लुबाडले अन्... मुंबईतील व्यावसायिकाची मोठी फसवणूक
अभ्यास करण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये बोलवलं
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण इलिनोइस विद्यापीठ अर्बाना-शँपेन (यूआययूसी) मधून पीएचडी करत आहे. त्याच्या ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून त्याची पीडित तरुणीशी ओळख झाली होती. दोघांच्याही पहिल्या भेटीनंतर, त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि एके दिवशी अभ्यास करण्याच्या बहाण्याने आरोपीने पीडितेला वांद्रे येथील मोठ्या हॉटेलमध्ये बोलवलं. त्यावेळी, आरोपी तरुणाने पीडितेसोबत बळजबरीने घृणास्पद कृत्य केल्याचा आरोप आहे.
हे ही वाचा: "मालकाच्या घरातून सामान उचलून नेणारे", NDA तील नेत्याची एकनाथ शिंदेंवर घणाघाती टीका
पीडितेने आईला सगळं सांगितलं
पीएचडी करत असलेल्या आरोपीने अमेरिकेत पीडितेसोबत एकत्र राहत असतानाही तिचे लैंगिक शोषण सुरूच ठेवल्याचा पीडितेचा आरोप आहे. काही दिवसांनंतर, आरोपीने इतर तरुणींना सुद्धा लग्नाचं आश्वासन दिल्याचं पीडितेला कळलं. पीडितेने याबद्दल तरुणाला जाब विचारला असता आरोपीने तिला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचं पीडितेने सांगितलं. तसेच, तिचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची आणि तिला जीवे मारण्याची धमकी सुद्धा आरोपीने दिली. या सगळ्याला वैतागून पीडितेने अखेर आरोपी तरुणाच्या घाणेरड्या कृत्याबद्दल तिच्या आईला सांगितलं आणि दोघींनी वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली.
ADVERTISEMENT
