Maharashtra Weather : राज्यातील 14 जिल्हे तापणार, हवामानाचा महत्त्वाचा अलर्ट

Maharashtra Weather : राज्यात भारतीय हवामान विभागाने 10 मार्च रोजी हवामानाचा अंदाज जारी केला आहे. राज्यातील बहुतांश विभागात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अलगद ठिकाणी उष्णतेची लाट किंवा उष्णतेची लाट अपेक्षित आहे. जाणून घ्या 10 मार्च रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

Maharashtra Weather

Maharashtra Weather

मुंबई तक

• 05:00 AM • 10 Mar 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

10 मार्च रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज

point

'या' जिल्ह्यांना तापमानाचा अलर्ट

Maharashtra Weather : राज्यात भारतीय हवामान विभागाने 10 मार्च रोजी हवामानाचा अंदाज जारी केला आहे. राज्यातील बहुतांश विभागात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तर उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अलगद ठिकाणी उष्णतेची लाट किंवा उष्णतेची लाट अपेक्षित आहे. जाणून घ्या 10 मार्च रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बुलढाणा : नवऱ्याने महिला शिक्षिकेच्या अपघातासाठी मित्राला दिली सुपारी, अपघाताचं स्वरुप दाखवून केली हत्या

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोकण, दक्षिण कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र. दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात सर्व उपविभागांमध्ये कोरडं राहण्याची शक्यता आहे. 

कोकण : 

कोकणात रायगड, रत्नागिरी, ठाणे, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हवामान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे.  आर्द्रता जास्त असल्याने उकाडा तीव्र जाणवेल. मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघरला तापमानाचा येलो अलर्ट जारी केला आहे. 

पश्चिम महाराष्ट्र :  

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमध्ये हवामान कोरडे राहील. तसेच तापमानात वाढ होईल. याच विभागातील पुणे शहरात कमाल 35-38 अंश, किमान 18-21 अंश तापमान राहील. 

मराठवाडा :

मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिवमध्ये उष्ण आणि कोरड्या हवामानाचा अंदाज जारी केला. 

हे ही वाचा : IT इंजिनिअरचं हैवानी कृत्य, जुळ्या बहिणीवर 40 वार.. आईलाही संपवण्याचा प्लॅन, पुण्यातील 'त्या' तरूणीचा भलताच अँगल!

विदर्भ :  

विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि गडचिरोली आणि बुलढाण्यात उष्ण हवामान असणार आहे. तापमानाची लाट पसरेल. यापैकी अमरावती, अकोला आणि वर्ध्यात तापमानाचा अलर्ट जारी केला आहे. 

    follow whatsapp