Maharashtra HSC Result 2026: ‘MSBSHSE’: बारावीच्या निकालाविषयी अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी, दुर्लक्ष नका करू!

Maharashtra HSC Result 2026 Update: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा मार्च महिन्यात पार पडली. ज्याचा 2 मे रोजी निकाल जाहीर होत आहे. त्याआधी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी.

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:59 PM • 01 May 2026

follow google news

MSBSHSE Class 12 Result 2026 Latest Updates: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा फेब्रुवारी-मार्च महिन्यात पार पडली. ज्याचा  निकाल 2 मे 2026 दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे. परीक्षा संपल्यानंतर आता विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रचंड उत्सुकता लागली आहे. परंतु, हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना नेमकं काय करावं लागणार आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

हे वाचलं का?

यंदाचा बारावीचा निकाल हा मागील काही वर्षांच्या तुलनेने लवकर लागणार असल्याचं पाहायला मिळत आहे. याबाबत शिक्षण मंडळाकडून अधिकृतपणे घोषणाही करण्यात आली आहे. आता या निकालासाठी अवघे काही तास उरले आहेत. तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी निकाल कुठे आणि कसा पाहावा, याबाबत आम्ही सविस्तर माहिती सांगणार आहोत. 

'या' वेबसाईट्सवर पाहता येणार बारावीचा निकाल 

  • mahahsscboard.in
  • mahresult.nic.in
  • hscresult.mkcl.org
  • msbshse.co.in
  • mh-ssc.ac.in
  • sscboardpune.in
  • sscresult.mkcl.org
  • hsc.mahresults.org.in

हे ही वाचा>> Maharashtra HSC Result 2026: 12वीचा निकाल mahresults.nic.in वेबसाइट आणि मोबाइलवर नेमका पाहायचा कसा?

12वीचा निकाल 2026– ग्रेडिंग सिस्टम कशी असेल?

  1. 75 टक्के आणि त्यापुढे – Distinction
  2. 60 टक्के आणि त्यापुढे – प्रथम श्रेणी (First Class)
  3. 45 टक्के to 59 टक्के – द्वितीय श्रेणी (Second Class)
  4. 35 टक्के to 44 टक्के – उत्तीर्ण श्रेणी (Pass Class)
  5. 35 टक्के पेक्षा कमी – अनुत्तीर्ण (Fail)

हे ही वाचा>> Maharashtra HSC 12th Result 2026 : बारावीचा निकाल दुपारी 1 वाजता, तुमची मार्कशीट डाऊनलोड करण्याची सोप्पी पद्धत

निकाल कसा पाहता येईल?

  • राज्य शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर जा 
  • वेबसाईटच्या होम पेजवर महाराष्ट्र HSC निकाल 2026 च्या लिंकवर क्लिक करा
  • त्यानंतर नवीन विंडोमध्ये माहिती भरून सबमिट बटणवर क्लिक करा
  • महाराष्ट्र निकाल असं स्क्रीनवर दिसेल
  • त्यानंतर तुम्हाला निकाल मोबाईल किंवा कॉम्युटरवर डाऊनलोड करता येईल. 

लाखो विद्यार्थी जेव्हा बोर्डाच्या वेबसाईटवर लॉग इन करतात, तेव्हा वेबसाईटवर लोड येतो. यामुळे तांत्रिक अडचणी आणि ओव्हरलोडची स्थिती निर्माण होते. अशावेळी विद्यार्थ्यांना मोबाइल ऑफलाइन पद्धतीने देखील त्यांचा निकाल पाहता येईल.