मुंबईची खबर : तीन हजार चोवीस रुपये! व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ; मुंबईकरांच्या खिशाला लागणार कात्री

LPG price hike : मुंबईकरांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. आजपासून (1 मे) व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये 993 रुपयांची वाढ झाली आहे.

LPG price hike

LPG price hike

मुंबई तक

• 02:18 PM • 01 May 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबईची खबर : तीन हजार चोवीस रुपये!

point

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

point

मुंबईकरांच्या खिशाला लागणार कात्री

LPG price hike : मुंबईकरांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. आजपासून (1 मे) व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये 993 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे मुंबईत आता व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 3024 रुपयांवर पोहोचली आहे. या दरवाढीमुळे हॉटेल व्यावसायिक आणि छोट्या उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अलीकडच्या काळात झालेली ही सर्वात मोठी दरवाढ मानली जात आहे.

हे वाचलं का?

मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये दरवाढ

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पुरवठ्यातील अडचणींमुळे तेल कंपन्यांनी हे पाऊल उचलले आहे. भारत आपल्या गरजेचा मोठा भाग आयातीद्वारे पूर्ण करत असल्याने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम स्थानिक दरांवर झाला आहे. मुंबईसह देशातील इतर प्रमुख शहरांमध्येही ही वाढ लागू झाली असली, तरी स्थानिक कर आणि वाहतूक खर्चामुळे शहरांनुसार किमतीत थोडी तफावत दिसून येत आहे. दिल्लीत हा दर 3071.50 रुपये, तर बेंगलोरमध्ये 3154 रुपये इतका झाला आहे.

हे ही वाचा : पुणे : कोंढवा परिसराला 'पाकिस्तानचं कराची शहर म्हणाला', भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

मुंबईकरांच्या खिशाला कात्री

या दरवाढीचा सर्वाधिक फटका मुंबईतील रेस्टॉरंट्स, कॅफे, हॉटेल्स आणि प्रामुख्याने रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांना बसणार आहे. इंधनाचे दर गगनाला भिडल्यामुळे येणाऱ्या काही दिवसांत हॉटेलमधील खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशालाही कात्री लागणार आहे. छोट्या व्यवसायांसाठी हा आर्थिक फटका सहन करणे मोठे आव्हान ठरणार आहे.

हे ही वाचा : 'बायकोचे तीन पुरुषांशी संबंध आहेत..' सॉफ्टवेअर इंजिनिअरने संपवले आयुष्य, 19 पानांच्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?

घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर

एकीकडे व्यावसायिक सिलिंडर महागला असताना, घरगुती वापराच्या गॅस ग्राहकांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मुंबईतील गृहिणींसाठी ही समाधानाची बाब असून, घरगुती सिलिंडरचे दर स्थिर ठेवल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्यापासून वाचले आहे.