Maharashtra HSC Result 2026: 12वीचा निकाल mahresults.nic.in वेबसाइट आणि मोबाइलवर नेमका पाहायचा कसा?

HSC Result 2026 LIVE: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra Board HSC Result 2026) MSBSHSE बारावीचा निकाल 4 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे.

how to check hsc result on website mahresultsnicin and mobile sms maharashtra hsc result 2026 class 12 result check mahresult nic in

प्रातिनिधिक फोटो, सौजन्य: Grok

मुंबई तक

01 May 2026 (अपडेटेड: 01 May 2026, 08:42 PM)

follow google news

Maharashtra HSC Result 2026: मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या MSBSHSE बारावीचा निकाल (HSC Result) हा आज (4 मे 2023) दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. 12 वीच्या विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाइन पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर बारावीचा निकाल जाहीर केला जाईल.

हे वाचलं का?

महाराष्ट्र बारावी बोर्डाची बारावीची परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च 2026 मध्ये पार पडली होती. बारावीच्या परीक्षेचा निकाल दरवर्षी साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच जाहीर केला जातो. पण यंदा पहिल्यांदाच मे महिन्याच्या सुरुवातीलाच निकाल जाहीर करण्यात येत आहे.

पाहा बारावीचा निकाल ऑनलाइन आणि  मोबाइलवर 

महाराष्ट्र बारावी निकाल 2026– mahresult.nic.in वेबसाइटव वर निकाल कसा पाहू शकता?

  • सगळ्यात आधी MSBSHSEच्या Mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन
  • होम पेजवर असलेल्या महाराष्ट्र बारावीचा निकाल 2026 या लिंकवर क्लिक करा.
  • लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर रिझल्ट पेज येईल.
  • या रिझल्ट पेजमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचा सीट नंबर तिथे टाका.
  • त्यानंतर पुढच्या टॅबमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या आईच्या नावाचे पहिले तीन अक्षर टाकावे लागणार आहे आणि त्यानंतरच त्यांना Submit हे बटण दाबावं.
  • उदाहरणार्थ, तुमचा सीट नंबर A859762 असेल आणि तुमच्या आईचे नाव अंजली असं असेल तर तुम्ही A859762 हा तुमचा सीट नंबर टाकून पुढच्या बॉक्समध्ये आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे म्हणजेच ANJ असं टाकावं लागेल.

हे ही वाचा>> Maharashtra HSC 12th Result 2026 : बारावीचा निकाल दुपारी 1 वाजता, तुमची मार्कशीट डाऊनलोड करण्याची सोप्पी पद्धत

Maharashtra HSC Result 2026: मोबाइलवरुन कसा पाहाल निकाल?

बारावीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोबाइलवरुन देखील बारावीचा निकाल पाहता येईल. अनेक वेळेस निकाल जाहीर झाल्यानंतर बहुतेक वेबसाइट या क्रॅश होतात. अशावेळी आपल्याला मोबाइलवरून देखील निकाल पाहता येईल.

हे ही वाचा>> Maharashtra HSC Result 2026 LIVE: उद्या दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल, 'ही' आहे निकालाची थेट लिंक

SMSद्वारे 12वीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना “MHHSC” असं टाकून 57766 वर SMS सेंड करायचा आहे. त्यानंतर निकाल त्यांच्या फोनवर SMSच्या माध्यमातून दिसेल.