भामट्यांनी 18 खात्यांमधून तब्बल 58 कोटी रुपये लुबाडले अन्... मुंबईतील व्यावसायिकाची मोठी फसवणूक

मुंबई तक

मुंबई पोलीसच्या क्राइम ब्रांचने एक व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीकडून 58 कोटी रुपये लुबाडल्याच्या आरोपाखाली तीन आरोपी तरुणांना अटक केली आहे.

ADVERTISEMENT

मुंबईतील व्यावसायिकाची मोठी फसवणूक
मुंबईतील व्यावसायिकाची मोठी फसवणूक
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भामट्यांनी तब्बल 58 कोटी रुपये लुबाडले अन्...

point

मुंबईतील व्यावसायिकाची मोठी फसवणूक

Mumbai Cyber Crime: मुंबई पोलीसच्या क्राइम ब्रांचने एक व्यावसायिक आणि त्याच्या पत्नीकडून 58 कोटी रुपये लुबाडल्याच्या आरोपाखाली तीन आरोपी तरुणांना अटक केली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सहभागी असल्याने आपली डिजिटल फसवणूक करण्यात आली असल्याचं पीडित व्यावसायिकाला वाटलं. आरोपींनी पीडित वृद्धाला ईडी आणि सीबीआय अधिकारी अशी स्वत:ची खोटी ओळख सांगितली आणि व्यावसायिक तसेच त्याच्या पत्नीच्या 18 खात्यांमधून पैसे काढून घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

सायबर क्राइम पोलिसांनी या प्रकरणातील तीन आरोपींना अटक केली असून अब्दुल नासिक खुल्ली, अर्जुन कडवासरा आणि जेठाराम कडवासरा अशी त्यांची ओळख समोर आली आहे. फसवणूक करताना आरोपींनी पीडित व्यावसायिकाला पैसे न दिल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाईची आणि त्याला अटकही करण्याची  धमकी दिली. 

वृद्धाच्या 18 खात्यांमधून पैसे काढले

आरोपींनी दिलेल्या धमक्यांमुळे पीडित व्यावसायिक घाबरला आणि तो पैसे देण्यासाठी तयार झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी वृद्धाच्या 18 खात्यांमधून पैसे काढले आणि व्यावसायिकाने 9 ऑगस्ट ते 8 ऑक्टोबर दरम्यान आरोपींना आरटीजीएसद्वारे एकूण 58.13 कोटी रुपये दिले. संबंधित प्रकरणाचा तपास सुरू असून सध्या पोलीस व्यावसायिकाच्या खात्यातून काढलेल्या रकमेची माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. 

हे ही वाचा: भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं निधन, वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आजच्या काळात फसवणूक करणाऱ्या भामट्यांसाठी डिजिटल हे पसंतीचं माध्यम बनत आहे. या प्रकरणात, आरोपी बनावट अरेस्ट वॉरंट, खोटी कागदपत्रे आणि कधीकधी बनावट पोलीस स्टेशनच्या साहाय्याने अनोळखी व्यक्तींना कॉल करून किंवा मेसेज करून फसवणूक करतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp