मुस्लीम व्यावसायिकाशी प्रेमविवाह, धर्मांतरण, चार मुलं आणि छळ; हिंदू धर्मात घरवापसी केलेल्या सायली सुर्वेचं प्रकरण काय?

Sayali Surve : 2019 ची मिस इंडिया अर्थ स्पर्धेतील सुंदरी, सायली सुर्वे हिचं शुद्धीकरण करून तिला हिंदू धर्मात सामावून घेण्यात आलंय. पिंपरी चिंचवडमधील रहिवासी असलेल्या सायलीन 2019 मध्ये मीरा भाईंदर शहरातील प्रसिद्ध उद्योजक आतिफ तासे सोबत घरच्यांचा विरोध झुगारून लग्न केलं होतं. मात्र आतिफ तासेशी लग्न करणे आपली चूक होती, लग्न झाल्यानंतर सतत आपला छळ केला गेला आणि धर्मांतरण देखील केलं गेलं असा आरोप सायलीने केलाय. 

Sayali Surve

Sayali Surve

मुंबई तक

10 Mar 2026 (अपडेटेड: 10 Mar 2026, 11:38 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

शुद्धीकरणानंतर पुण्यातील सायली सुर्वेचा पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश

point

मुस्लीम व्यावसायिकाशी केला होता प्रेमविवाह

point

नेमकं प्रकरण काय?

Sayali Surve : 2019 ची मिस इंडिया अर्थ स्पर्धेतील सुंदरी, सायली सुर्वे हिचं शुद्धीकरण करून तिला हिंदू धर्मात सामावून घेण्यात आलंय. पिंपरी चिंचवडमधील रहिवासी असलेल्या सायलीन 2019 मध्ये मीरा भाईंदर शहरातील प्रसिद्ध उद्योजक आतिफ तासे सोबत घरच्यांचा विरोध झुगारून लग्न केलं होतं. मात्र आतिफ तासेशी लग्न करणे आपली चूक होती, लग्न झाल्यानंतर सतत आपला छळ केला गेला आणि धर्मांतरण देखील केलं गेलं असा आरोप सायलीने केलाय. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : सोनं-चांदी, शेतजमीन ते कर्ज...; शिंदेंच्या शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या ज्योती वाघमारेंची संपत्ती किती?

सायलीचा नेमका आरोप काय आहे?

सायली सुर्वेने 2019 मध्ये आतिफ तासे सोबत लग्न केलं होतं. मात्र कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. सायलीने हा विरोध झुगारुन आतिफशी लग्न केले. लग्नानंतर तिचं नाव अतेझा असं करण्यात आलं. मात्र तिचा ह्या निर्णयामुळे तिला बराच त्रास सहन करावा लागला. सायलीने सांगितले की, आतिफ तासेशी लग्न करणं ही तिच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती. लग्नानंतर काही काळातच तिचा छळ सुरु झाला. तसेच तिचे धर्मांतरण ही करण्यात आल्याचा आरोप सायलीने केला आहे.

पोलिसांकडून प्रतिसाद नाही

या बाबत अनेकवेळा आपण पोलिसांकडे तक्रार केली होती, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचं सायलीनं सांगितलं. बराच काळ त्रास सहन केल्यानंतर आणि पोलिसांकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने सायलीने हिंदुत्त्ववादी संघटनांशी संपर्क साधला. यानंतर सायलीला परत हिंदू धर्मात घेण्यासाठी अशा पद्धतीने होम हवन मंत्रोच्चार करण्याची प्रक्रिया राबवली गेली. या शुद्धीकरण प्रक्रियेदरम्यान तिचं पुन्हा एकदा नामकरण करण्याल आलं. यावेळी तिला 'आद्या सुर्वे' हे नावं देण्यात आलं आहे.

हे ही वाचा : काँग्रेस नेत्याची आमदारकी रद्द, उच्च न्यायालयाने भाजपच्या पराभूत उमेदवाराला आमदार करुन टाकलं, नेमकं कारण काय?

कृपा करुन त्रास सहन करु नका

सायलीने सांगितलं की, ज्या मुली असा प्रकार सहन करत असतील त्यांनी तसं करु नये. देवाने अशा रावणांसमोर हारुन जाण्यासाठी आपल्याला आयुष्य दिलेलं नाही. मला ४ मुलं असल्यामुळं मी खचून गेले होते. मुलांकडे पाहून आई कधीच घर तुटावं असा विचार करत नाही. याच विचारात मी १० वर्ष काढली.  मात्र माणूस म्हणून माझा संयम संपला होता. मी माझ्या मुलांसाठी बाहेर पडले.

    follow whatsapp