Beed Crime : रोहिदास हातागळे - प्रेमसंबंधात अडथळा ठरणाऱ्या नवऱ्याची पत्नीने प्रियकराच्या मदतीने हत्या केली. तांत्रिक तपास केला असता, आरोपंनी एकमेकांना केलेल्या कार्यक्रम ओक्के या कोडवर्ड कॉलमुळे संबंधित गुन्ह्याचा पर्दाफाश करण्यात आला होता. लिंबागणेश परिसरात एका थरारक हत्याकांडाचा पोलिसांनी अवघ्या 5 दिवसांत छडा लावला असता, हे प्रकरण उघडकीस आले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : बीड: अधिक मासात जावयाला आणलेली अंगठी मांजरीने गिळली, पुढं काय घडलं?
आरोपींना पनवेल येथून अटक
या प्रकरणातील मृत्यू पतीची ओळख किरण सोनवणे अशी आहे. त्यांचा मृतदेह दुचाकीखाली दाबून रस्त्याच्या कडेला टाकण्यात आला होता. शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्याचे समोर आल्यावर. नेकनूर पोलिसांनी तांत्रिक तपास केल्यानंतर प्रियकर दशरथ परदेशी त्याचा मित्र धीरज येडे आणि मृत व्यक्तीची पत्नी प्रियंका सोनवणे या तिघांना पनवेल येथून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा : नवरा बायकोच्या हनिमूनला नणंद, सासू-सासरे गेले; बायको रागवली अन्..
बायकोनं प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली
प्रेमसंबंधातून पतीच्या जाचाला कंटाळून बायकोनं प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली होती. हत्या झाल्यानंतर आरोपींनी एकमेकांना कार्यक्रम ओके असा फोन कॉल केला होता. नकनूर पोलिसांनी या गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावला होता.
ADVERTISEMENT











