देवेंद्र फडणवीसांची अजितदादांवर कुरघोडी, सोलापुरातील राष्ट्रवादीचे 3 माजी आमदार भाजपने गळाला कसे लावले?

मुंबई तक

Solapur Politics : देवेंद्र फडणवीसांची अजितदादांवर कुरघोडी, सोलापुरातील राष्ट्रवादीचे 3 माजी आमदार भाजपने गळाला कसे लावले?

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

देवेंद्र फडणवीसांची अजितदादांवर कुरघोडी

point

सोलापुरातील राष्ट्रवादीचे 3 माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा

Solapur Politics : सोलापूरच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. स्थानिक पातळीवर मोठी ताकद असलेले नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. माढ्याचे माजी आमदार बबनदादा शिंदे, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही नेते उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विश्वासू मानले जातात. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार गळाला लावून अजित पवारांवर कुरघोडी केल्याचे बोलले जात आहे. शिवाय, काही दिवसांपूर्वी सोलापुरात  स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं होतं. यावेळी या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा देखील केली होती. 

हेही वाचा : अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं अन् अपहरण करुन घाणेरडं कृत्य! अखेर, 16 महिन्यांनंतर समोर आलं आरोपीचं सत्य

माजी आमदारांसाठी वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांची बैठक 

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गुरुवारी (दि.10) रात्री वर्षा बंगल्यावर सोलापुरातील माजी आमदारांची बैठक घेतली. यावेळी मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने उपस्थित होते. शिवाय बबनदादा शिंदे हे सध्या अमेरिकेत उपचार घेत असले तरी देखील त्यांचे रणजित शिंदे आणि विक्रम शिंदे हे दोन्ही पुत्र गुरुवारी देवेंद्र फडणवीसांना भेटले आहेत. दरम्यान, या सर्वांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा बोलून दाखवली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी देखील होकार दिल्याची माहिती समोर आलीये. काही दिवसांत चारही माजी आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे.

दिलीप माने काँग्रेसमधून भाजपात जाणार असल्याची चर्चा

दरम्यान, याबाबत दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांनी लागलीच प्रतिक्रिया देखील देऊन टाकलीये. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमची बैठक झाली असून यापूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी अनेक वेळा चर्चा झाली आहे. दुहेरी पाईपलाईन, सोलापूर-मुंबई विमानसेवा आणि आयटी पार्क या आमच्या प्रमुख मागण्या मुख्यमंत्री यांनी मान्य केल्या आहेत. मी ना सत्ताधारी पक्षात आहे, ना विरोधात; मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आता स्थानिक निवडणुकांसाठी आम्हाला भूमिका घ्यावी लागणार आहे. मुख्यमंत्री यांनी मला सहकार्याची हमी दिली असून त्यांच्या सांगण्यानुसारच आम्ही काम करणार आहोत.” असं दिलीप माने म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp