Govt Job: सीमा सुरक्षा दलात सहभागी होण्यासाठी आत्ताच करा अर्ज... 'या' पदांसाठी निघाली भरती!

मुंबई तक

BSF च्या स्पोर्ट्स कोटा अंतर्गत कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) च्या रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी 16 ऑक्टोबर पासून अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार rectt.bsf.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.

ADVERTISEMENT

'या' पदांसाठी निघाली भरती!
'या' पदांसाठी निघाली भरती!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सीमा सुरक्षा दलात सहभागी होण्याची सुवर्णसंधी

point

BSF च्या 'या' पदांसाठी निघाली भरती!

point

काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?

BSF Recruitment 2025: बॉर्डर सिक्योरिटी फोर्स (BSF) म्हणजेच सीमा सुरक्षा दलात सहभागी होण्यासाठी नवीन संधी उपलब्ध झाली आहे. BSF च्या स्पोर्ट्स कोटा अंतर्गत कॉन्स्टेबल (जनरल ड्यूटी) च्या रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी 16 ऑक्टोबर पासून अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवार rectt.bsf.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 4 नोव्हेंबर 2025 ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. 

शैक्षणिक पात्रता 

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून 10 वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. तसेच, उमेदवाराने राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रीय स्तरावर संबंधित खेळाचे प्रतिनिधित्व केलेले असावे. याव्यतिरिक्त, भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 23 वर्षांपेक्षा जास्त नसावे. सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. 1 ऑगस्ट 2025 ही तारीख लक्षात घेऊन उमेदवारांच्या वयाची गणना केली जाईल. 

या भरतीमध्ये केवळ ऑनलाइन माध्यमातूनच उमेदवारांना अर्ज करता येतील. याशिवाय, कोणत्याही प्रकारचे अर्ज स्विकारले जातील. 

हे ही वाचा: मॉर्निंग वॉकला गेलेल्या आईला पाहण्यासाठी चिमुकली गॅलरीकडे धावली, 7 व्या मजल्यावरुन खाली पाहिलं अन्..

कसा कराल अर्ज?

1. बीएसएफ कॉन्स्टेबल GD भरती 2025 मध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वप्रथम rectt.bsf.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. 
2. त्यानंतर, होमपेजवरील  Current Recruitment Openings सेक्शनमध्ये जाऊन भरतीशी संबंधित लिंकवर जाऊन क्लिक करा. 
3. आता आवश्यक माहिती भरून रजिस्ट्रेशन पूर्ण करा. 
4. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर, उमेदवारांनी इतर आवश्यक माहिती भरून आणि डॉक्यूमेंट्स अपलोड करुन अर्ज सबमिट करा. 

हे वाचलं का?

    follow whatsapp