आम्ही मागासवर्गीय नाहीत, जातीय जनगणेत सहभागी होण्यास सुधा मूर्ती आणि नारायण मूर्तींचा नकार
Narayana Murthy and Sudha Murty opt out of Karnataka caste survey : आम्ही मागासवर्गीय नाहीत, जातीय जनगणेत सहभागी होण्यास सुधा मूर्ती आणि नारायण मूर्तींचा नकार
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

जातीय जनगणेत सहभागी होण्यास सुधा मूर्ती आणि नारायण मूर्तींचा नकार

आम्ही जातीय जनगणेत सहभागी होण्यास जबरदस्ती करणार नाही
Narayana Murthy and Sudha Murty opt out of Karnataka caste survey : इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांनी कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षणात म्हणजेच ‘जातीय जनगणने’त सहभागी होण्यास नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वी सर्वेक्षण करणारे अधिकारी त्यांच्या घरी गेले असता, त्यांनी सांगितले ,“आम्हाला आमच्या घरी सर्वेक्षण करून घ्यायचे नाही.” सुधा मूर्ती यांनी सर्वेक्षण फॉर्ममध्ये माहिती भरण्यास नकार देत डॉक्युमेंटवर स्वाक्षरी केली आहे. त्यात त्यांनी सांगितले की – “आम्ही मागासवर्गीय समाजातून नाहीत. त्यामुळे अशा समाजांसाठी करण्यात येणाऱ्या सरकारी सर्वेक्षणात आम्ही भाग घेणार नाही.”
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सुधा मूर्ती आणि त्यांच्या कुटुंबाच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना सांगितले – “सर्वेक्षणात भाग घेणे ही ऐच्छिक बाब आहे. कोणाला माहिती द्यायची नसेल, तर आम्ही कोणालाही जबरदस्ती करू शकत नाही.”
कर्नाटकमध्ये जातीय जनगणना
कर्नाटकमध्ये जातीय जनगणना 22 सप्टेंबरपासून सुरू झाली असून ती 18 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. हे सर्वेक्षण कर्नाटक राज्य मागासवर्ग आयोग (KSCBC) करत आहे. सुरुवातीला हे सर्वे 7 ऑक्टोबरला संपणार होते, परंतु नंतर मुदत वाढवण्यात आली. कर्नाटक उच्च न्यायालयाने 25 सप्टेंबरला KSCBC ला निर्देश दिले होते की त्यांनी सार्वजनिक अधिसूचना जारी करून स्पष्ट करावे की हे सर्वेक्षण ऐच्छिक आहे आणि कोणालाही आपली वैयक्तिक माहिती देण्यास भाग पाडले जाणार नाही.
हेही वाचा :ऑक्टोबर महिन्यात दिवाळीच्या तोंडावर ग्रहांची हालचाल, 'या' राशीतील लोकांवर संकट कोसळणार?