बॉयफ्रेंडला लोक म्हणायचे 'हा तर तुझा मुलगा.. म्हणून मी...' तरूणीने सांगितली 'ती' गोष्ट!
27 वर्षीय केटी वूल्स ही तिच्या असामान्य उंचीमुळे प्रचंड चर्चेत आहे. पण त्यापेक्षी ती या गोष्टीला कंटाळली आहे की, तिला तिच्या उंचीमुळे बॉयफ्रेंड मिळेना झाला आहे.
ADVERTISEMENT

लंडन: प्रत्येक तरुण मुलगा किंवा मुलगी ही आपली उंची जास्त असावी अशीच अपेक्षा करत असतो. ज्यांची उंची फार वाढत नाही ते अनेकदा याबाबत पश्चात्ताप करतात. परंतु एका महिलेला, बरीच उंची लाभलेली असूनही ती पश्चात्ताप व्यक्त करतेय. यामागचं कारण म्हणजे तिला बॉयफ्रेंड शोधण्यात अडचण येत आहे. लोक तिच्या एक्स बॉयफ्रेंडला चक्क तिचा मुलगा समजायचे, ज्यामुळे तिला लाज वाटायची. याबाबतचं सगळं दु:ख तिने अलीकडेच सोशल मीडियावर व्यक्त केलंय.
लहानपणापासूनच होती बरीच उंच
डेली स्टारमधील एका वृत्तानुसार, लंडनमधील 27 वर्षीय मॉडेल केटी वूल्स सध्या तिच्या असामान्य उंचीमुळे चर्चेत आहे. तब्बल 6 फूट 9 इंच एवढी उंची असलेली केटी म्हणते की, 'तिची उंचीच प्रेम मिळवण्यात तिच्यासाठी सर्वात मोठा अडथळा बनली आहे.' सोशल मीडियावर '@tallgirlkatie' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केटीचे दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. परंतु तिचे लाखो चाहते असूनही, ती गेल्या अडीच वर्षांपासून एकटीच आहे. म्हणजेच तिला तिचा जोडीदार सापडलेला नाही.
हे ही वाचा>> चहा पिताच महिलेला झाला भलताच आजार, चिकटपट्टी लावून करावा लागतो डोळा बंद! कारण...
केटी म्हणते की, तिची उंची अनेक पुरुषांसाठी "भीतीदायक" असल्याचे सिद्ध होते. ती म्हणते, "सिद्धांतानुसार, प्रत्येकजण म्हणतो की त्यांना उंच मुली आवडतात, परंतु जेव्हा एखाद्याला कळते की मी त्यांच्यापेक्षा एक फूट उंच आहे, तेव्हा त्यांना अडचण वाटू लागते." एका नात्यात परिस्थिती इतकी बिकट झाली की लोक तिच्या प्रियकराला तिचा मुलगा समजू लागले. "लोक म्हणायचे की तो माझ्या मुलासारखा दिसतो, ज्यामुळे मला खूप लाज वाटली. अखेर आमचे नाते संपले."

अकाली जन्मलेली केटी ही लहानपणापासूनच वेगाने उंच झाली. लहानपणीच ती तिच्या मोठ्या भावापेक्षाही उंच होती आणि लोक तिला त्याची मोठी बहीण समजू लागले होते. ती कबूल करते की, तिची उंची स्वीकारणे हा एक लांबचा प्रवास आहे, परंतु आता ती आत्मविश्वासाने ही गोष्ट स्वीकारते.