Govt Job: मुंबई पोर्ट ऑथरिटीमध्ये थेट भरती! ना कोणतीही परीक्षा अन् कार्याचा अनुभव... कधीपर्यंत कराल अर्ज?

मुंबई तक

मुंबई बंदर प्राधिकरण (MpA) कडून ग्रॅज्युएट अप्रेन्टिस आणि कंप्यूटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA)मध्ये अप्रेन्टिसशिप पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

मुंबई पोर्ट ऑथरिटीमध्ये थेट भरती!
मुंबई पोर्ट ऑथरिटीमध्ये थेट भरती!
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई पोर्ट ऑथरिटीमध्ये थेट भरती!

point

कधीपर्यंत कराल अर्ज?

point

ना कोणतीही परीक्षा अन् कार्याचा अनुभव...

Mumbai Port Authority Recruitment 2025: मुंबई पत्तन प्राधिकरणात फ्रेशर्स उमेदवारांसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई बंदर प्राधिकरण (MpA) कडून ग्रॅज्युएट अप्रेन्टिस आणि कंप्यूटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA)मध्ये अप्रेन्टिसशिप पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीचं अधिकृत नोटिफिकेशन जारी झालं असून इच्छुक आणि पात्र उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करण्यासाठी 10 नोव्हेंबर 2025 शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे. 

शैक्षणिक पात्रता 

ग्रॅज्युएट अप्रेन्टिस पदासाठी भरती करण्यासाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून  बी.ई (B.E)/ बी.कॉम (B.Com)/ बी.ए (B.A)/ बीएससी (B.Sc)/ बीसीए (BCA) अशा कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशनची डिग्री असणं आवश्यक आहे. तसेच, कंप्यूटर ऑपरेटर अॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट पदासाठी 10 वी उत्तीर्ण COPA ट्रेड सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. अप्रेन्टिस ट्रेनिंग पूर्ण झालेले उमेदवार नव्या अप्रेन्टिसशिप प्रोग्रामसाठी अर्ज करू शकणार नाहीत. 

वयोमर्यादा

या अप्रेन्टिसशिप ट्रेनिंगमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांचं किमान 14 वर्षे पूर्ण असणं आवश्यक आहे. तसेच, कमाल वयोमर्यादेसाठी बंधनकारक नियम नाही. 14 ते 18 वर्षे वयोगटातील तरुणांच्या अप्रेन्टिसशिप कॉन्ट्रॅक्टवर त्यांच्या पालकांची सही लागेल.

हे ही वाचा: दोन मुलांची आई प्रियकरासोबत पळून गेली! पाच वर्षांनंतर, 'त्या' गोष्टीमुळे पुन्हा घरी आली अन्... नेमकं प्रकरण काय?

एकूण 116 रिक्त जागा जाहीर

MpA ने एकूण 116 जागा जाहीर केल्या असून यामध्ये 11 पदवीधर अप्रेन्टिस आणि 105 COPA ट्रेड अप्रेन्टिसचा समावेश आहे. हे पदे बंदराच्या दैनंदिन कामकाज, संगणकीय व्यवस्थापन आणि तांत्रिक क्षेत्रात कुशल कामगार तयार करण्यासाठी आहेत. अर्ज फॉर्म वेबसाइटवरून डाउनलोड करा, हाताने भरून आवश्यक कागदपत्रांसह (मार्कशीट, आधार, पॅन, जातप्रमाणपत्र इ.) ATC, भंडार भवन, माझगाव येथे पाठवा. ₹100 अर्ज शुल्क NEFT द्वारे भरावे लागेल. तारखेनंतरचे अर्ज नाकारले जातील, याची नोंद घ्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp