Govt Job: 7 वी पास ते ग्रॅज्युएट तरुणांनी मिळवा सरकारी बँकेत नोकरी! लवकरच करा अर्ज...
सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) कडून फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, अटेंडर आणि वॉचमन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

7 वी पास ते ग्रॅज्युएट तरुणांसाठी सरकारी बँकेत भरती

'या' पदांसाठी लवकरच करा अर्ज...
CBI Recruitment 2025: 7 वी उत्तीर्ण ते ग्रॅज्युएट अशी शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना सरकारी बँकेत नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) कडून फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, अटेंडर आणि वॉचमन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवार centralbank.bank.in या बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. तसेच, 18 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
या पदांसाठी निघाली भरती
1. फॅकल्टी: 02
2. ऑफिस असिस्टंट: 02
3. अटेंडर: 01
4. वॉचमन/ गार्डनर: 01
काय आहे पात्रता?
ही भरती सेंट्रल बँक ऑफ इंडिया सामाजिक उत्थान अवम शिक्षण संस्था (CBI-SUAPS) साठी केली जाणार आहे. वॉचमन/ गार्डनर पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून 7 वी उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. तसेच, अटेंडर पदासाठी 10 वी उत्तीर्ण पात्रता निश्चित करण्यात आली आहे.
ऑफिस असिस्टंट पदांसाठी ग्रॅज्युएट, बीएसडब्ल्यू/ बी.ए/ बी.कॉम आणि फॅकल्टी पदांसाठी कोणत्याही विषयात ग्रॅज्युएट/ पोस्ट ग्रेजुएट, MSW/ MA/ सोशियोलॉजी/ बी.एससी/ बीए बीएड अशी पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. याशिवाय, संबंधित क्षेत्रात कार्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना भरतीमध्ये प्राधान्य दिलं जाईल. उमेदवार भरतीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन पात्रता तपासू शकतात.