धावत्या रिक्षात महिलेवर सामुहिक बलात्कार, पोलिसांनी तीन नराधमांना उचललं; अमानवी कृत्याने देश हादरला

मुंबई तक

Crime News : राजघाटजवळील गांधी स्मृती मार्गावरून पोलिसांना तिचे रक्ताने माखलेले कपडेही मिळाले, ज्यामुळे तपासाला महत्त्वाचे सूत्र मिळाले.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

धावत्या रिक्षात महिलेवर सामुहिक बलात्कार

point

पोलिसांनी तीन नराधमांना उचललं; अमानवी कृत्याने देश हादरला

दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये घडलेल्या एका अमानवी कृत्याने संपूर्ण देश हादरला आहे. गेल्या महिन्यात 11 ऑक्टोबरच्या रात्री नौसेनेच्या अधिकाऱ्यांना कालेखान परिसरात रस्त्याच्या कडेला एक महिला गंभीर अवस्थेत आढळली. ती रक्ताने माखलेली आणि अर्धबेशुद्ध स्थितीत असल्याचे पाहताच जवानांनी तातडीने तिला एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये हलवले आणि याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली.

महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने सुरुवातीला तिच्याकडून कोणतीही स्पष्ट माहिती मिळणे अशक्य होते. ती मानसिक धक्क्यात असल्याने अनेक प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नव्हती. तिच्यावर वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यातून एक धक्कादायक सत्य समोर आले – तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.

धावत्या रिक्षातील नराधमांची कृत्ये उघड

ओडीशाची रहिवासी असलेली 34 वर्षीय पीडिता काही वर्षांपासून दिल्लीमध्ये राहत होती आणि तिने नर्सिंगचे शिक्षण घेतले होते. तपासात असे उघड झाले की तीन जणांनी मिळून धावत्या रिक्षामध्ये तिच्यावर अत्याचार केला. घटनेनंतर पीडिता रस्त्याच्या कडेला गंभीर जखमी अवस्थेत फेकून देण्यात आली होती. राजघाटजवळील गांधी स्मृती मार्गावरून पोलिसांना तिचे रक्ताने माखलेले कपडेही मिळाले, ज्यामुळे तपासाला महत्त्वाचे सूत्र मिळाले.

एका महिन्यानंतर आरोपींना अखेर अटक

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी जवळपास एक महिना मोठ्या प्रमाणावर चौकशी, सीसीटीव्ही स्कॅनिंग आणि तांत्रिक तपास केला. अखेर तिघेही आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले. बलात्काराच्या या घृणास्पद कृत्यात सामील असलेल्यांमध्ये रिक्षाचालक प्रभु, भंगार कारखान्यात काम करणारा प्रमोद आणि शमशुल यांचा समावेश आहे. ज्याच्यातून पीडितेवर अत्याचार करण्यात आला तो रिक्षाही पोलिसांनी जप्त केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp