पुणे : जुन्नरमध्ये तीन कुत्र्यांनी मिळून बिबट्याला पिटाळून लावलं; पाहा व्हिडीओ

मुंबई तक

Pune leopard vs dog News : सहजरीत्या एक-दोन कुत्र्यांवर झडप घालून त्यांना संपवणारा बिबट्या या प्रसंगात मात्र पूर्णतः असमर्थ ठरल्याचं दृश्य पाहायला मिळालंय..

ADVERTISEMENT

Pune leopard vs dog News
Pune leopard vs dog News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पुणे : जुन्नरमध्ये तीन कुत्र्यांनी मिळून बिबट्याला पिटाळून लावलं; पाहा व्हिडीओ

point

घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Pune leopard vs dog News : पुणे जिल्ह्यात बिबट्यांच्या वावरामुळे गेल्या अनेक आठवड्यांपासून नागरिकांमध्ये भितीचं वातावरण आहे. नुकतंच जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी परिसरातून समोर आलेल्या एका सीसीटीव्ही व्हिडीओने स्थानिकांना पुन्हा एकदा हादरवून टाकलं आहे. मात्र या वेळी भीतीपेक्षा लोकांचं लक्ष वेधून घेतलंय वेगळ्या प्रकाराने... जुन्नरमध्ये तीन कुत्र्यांनी मिळून बिबट्याला पिटाळून लावल्याचं पाहायला मिळालंय..या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. शनिवार, 6 डिसेंबरच्या पहाटे साधारण दीड वाजता हा प्रकार घडला.

अधिकची माहिती अशी की, गुंजाळवाडीतील शेतकरी अशोक दरेकर यांच्या बंगल्याच्या मुख्य गेटजवळ बिबट्या दबकत पोहोचला. नेहमीप्रमाणे शिकारीच्या उद्देशाने परिसराची पाहणी करत तो घराच्या आवारात शिरण्याचा प्रयत्न करत होता. मात्र आत असणाऱ्या तीन कुत्र्यांनी बिबट्याच्या हालचाली ओळखून तात्काळ जोरजोरात भुंकायला सुरुवात केली.

हेही वाचा : 'बायकोची सेवा करण्यासाठी मला आणलं घरी, 4 वर्ष माझ्यासोबत शारीरिक संबंध अन्..', वयस्कर पुरुषाचे विवाहित महिलेसोबत भलतेच चाळे

सीसीटीव्हीत स्पष्ट दिसतं की, बिबट्या सावधपणे आत शिरण्याचा प्रयत्न करतो, पण कुत्र्यांचा आक्रमक आवाज त्याला थेट रोखतो. काही क्षण बिबट्या थांबून परिस्थितीचा अंदाज घेतो; मात्र तिघेही कुत्रे एकत्रितपणे त्याच्यावर दादागिरी करताच तो एकदम घाबरतो आणि मागे वळत धूम ठोकत पळून जातो.

हे वाचलं का?

    follow whatsapp