'बायकोची सेवा करण्यासाठी मला आणलं घरी, 4 वर्ष माझ्यासोबत शारीरिक संबंध अन्..', वयस्कर पुरुषाचे विवाहित महिलेसोबत भलतेच चाळे
पत्नीसाठी केअरटेकर म्हणून घरी आणलेल्या एका महिलेसोबत तब्बल 4 वर्ष शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिच्यावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना नुकतीच समोर आली आहे.
ADVERTISEMENT

झाशी: "मी दुग्गल पांडे आहे. माझा एक मित्र पोस्ट ऑफिसमध्ये काम करतो. त्याचे नाव अनुप व्यास आहे. अनुप व्यासची पत्नी अर्धांगवायूग्रस्त आहे आणि आजारी आहे. तिला केअरटेकरची गरज आहे. तुम्ही ते करू शकता का? त्या मोबदल्यात तुम्हाला चांगला पगार, राहण्याची व्यवस्था आणि जेवण मिळेल..." दुग्गल पांडेची ही ऑफर ऐकून, बरुसागर शहरातील रहिवासी असलेली महिला ही लागलीच सहमत झाली. महिलेच्या नवऱ्याकडे कोणताही रोजगार नव्हता. त्यामुळे महिलेला ही ऑफर चांगली वाटली.
त्यावेळी महिलेला वाटलं की, जर हे काम तिला मिळालं तर तिच्या कुटुंबासाठी काही पैसे कमावू शकते. पगाराव्यतिरिक्त इतरही काही सुविधा होत्या. त्यामुळे तिने हे काम स्वीकारलं. यानंतर दुग्गल पांडे याने महिलेची अनूप व्यास याच्याशी ओळख करून दिली. त्यानंतर त्याच्यातील नोकरीचा करार निश्चित झाला. पण पुढे जे काही घडलं त्याचा आता महिलेला प्रचंड पश्चाताप होत आहे. उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये एक विचित्र घटना घडल्याचं आता समोर आलं आहे.
अनुपने महिलेच्या पतीलाही लावली नोकरी
महिला तिच्या संपूर्ण कुटुंबासह अनुपच्या घरी राहू लागली. अनुपने छतावर तीन शेड बांधून महिला आणि तिच्या कुटुंबाची राहण्याची व्यवस्था केली होती. अनुपने महिलेच्या पतीला पोस्ट ऑफिसमध्ये कामही मिळवून दिलं. त्यामुळे सर्व काही व्यवस्थित चाललं होते. याच दरम्यान, अनुपची महिलेशी जवळीक वाढली. एवढंच नव्हे तर त्यांच्यात शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले.
हे ही वाचा>> दिरासाठी मुलगी पाहायला निघालेल्या वहिनीचा रस्त्यातच गेला जीव, असं घडलं तरी काय?
'अनुपच्या पाहून त्याचा मुलगा दिल्लीला गेला'
महिलेने याबाबत सांगताना पुढे म्हणाली की, "त्याने मला आणि माझ्या मुलांना नेहमी एकत्र ठेवण्याचे आश्वासन देऊन शरीरसंबंध सुरू ठेवले. हे चार वर्ष चालू होतं. अनूपच्या या कृतीमुळे त्याचा मुलगा त्याच्या कुटुंबासह दिल्लीला राहण्यासाठी गेला. यामुळे, मी त्याच्याशी संबंध तोडू इच्छित होते. पण अनूपने माझ्या पतीला आणि मुलांना सर्व काही सांगण्याची धमकी दिली. यानंतरही मी निघून जाण्याचा प्रयत्न केला, परंतु अनुप व्यासने माझी बदनामी करण्याची धमकी देत मला त्याच्या घरातून जाण्यापासून रोखलं."










