दिरासाठी मुलगी पाहायला निघालेल्या वहिनीचा रस्त्यातच गेला जीव, असं घडलं तरी काय?

मुंबई तक

Sangli Accident: सांगली जिल्ह्यातील मिरज–पंढरपूर मार्गावरील सिव्हिल हॉस्पिटलसमोर झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तिचा पती गंभीर जखमी झाला आहे.

ADVERTISEMENT

woman died on spot in a horrific accident in front of  civil hospital on miraj pandharpur road in sangli district
सांगलीत महिलेचा अपघाती मृत्यू
social share
google news

सांगली: सांगली जिल्ह्यातील मिरज-पंढरपूर मार्गावर सिव्हिल हॉस्पिटलसमोर आज सकाळी झालेल्या एका भीषण अपघातात एका ३२ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, अपघातानंतर डंपर चालकाने पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांनी त्याला तातडीने अटक केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

नेमकी घटना काय?

अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव नंदनी मच्छिंद्र दोलतडे (वय ३२) असून, तिचा जखमी पती मनोज कृष्णदेव दोलतडे (वय ३२) आहे. हे दांपत्य मोटारसायकलवरून मिरजकडून सोलापूरच्या दिशेने दिराला मुलगी पाहण्यासाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. नंदनी या मोटारसायकलच्या मागील सीटवर बसल्या होत्या, तर मनोज गाडी चालवत होते.

हे ही वाचा>> प्रियकराच्या नादाला लागली अन् नको ते करून बसली! मामा-मामीसोबतच केला कांड...

प्राप्त माहितीनुसार, सकाळच्या वेळी दांपत्य सिव्हिल हॉस्पिटलसमोर पोहोचले असतानाच मागून येणाऱ्या भरधाव डंपरने (क्रमांक MH-10-7326) त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भयानक होती की, नंदनी बाइकवरून खाली फेकल्या गेल्या आणि डंपरच्या मागील चाकाखाली येऊन चिरडल्या गेल्या. परिणामी, त्यांचा जागीच मृत्यू झाला. मनोज हे अपघातात गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र सिव्हिल हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याला ट्रॅक करून अटक केली. पोलिसांनी डंपर जप्त केले असून, चालकाविरुद्ध वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, सीसीटीव्ही फुटेज हे महत्त्वपूर्ण पुरावा ठरणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp