सोलापूर : बेघर महिलेने 3 वर्षांच्या बाळाला गोव्यात नेऊन विकले, आता DNA टेस्ट होणार, रक्ताचे नमुनेही घेतले
Solapur News : तिची ओळख पटल्यावर गोवा पोलिसांनी मुलासोबतचा तिचा संबंध तपासण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित महिलेनं तो मुलगा आपल्या ताब्यात नसल्याचा दावा केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
सोलापूर : बेघर महिलेने 3 वर्षांच्या बाळाला गोव्यात नेऊन विकले
आता DNA टेस्ट होणार, रक्ताचे नमुनेही घेतले
Solapur News : गोवा पोलिसांनी तीन वर्षांच्या लहान मुलाला विक्रीसाठी नेल्याच्या संशयावरून सोलापुरातील एका बेघर महिलेची चौकशी केली आहे. मुलाच्या ओळखीबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे महिलेची डीएनए चाचणी करण्यात येत असून, पुढील तपासाचे दिशानिर्देशन याच निकालावर अवलंबून राहणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.
ही कारवाई काणकोण पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या प्रकरणानंतर सुरू झाली. गोव्यात एका अज्ञात महिलेच्या ताब्यात तीन वर्षांचा मुलगा आढळला होता. त्याच्या संगोपनाबाबत कोणतीही अधिकृत परवानगी नसल्याने पोलिसांनी चौकशी सुरू केली. पोलिसांनी विचारपूस केली असता त्या चिमुरड्याने आपण पूर्वी सोलापुरात राहत असल्याचे सांगितले. यानंतर तपासाचा धागा सोलापूरकडे वळला.
मुलाशी संबंधित माहिती गोळा करताना पोलिसांना कळाले की, हा मुलगा ज्या महिलेसोबत होता, ती सोलापूरमध्ये दिसल्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर गोवा पोलिसांचे पथक शुक्रवारी सोलापुरात दाखल झाले. स्थानिक पोलीस हवालदार अभिजित वामने यांच्या मदतीने शोधमोहीम सुरू करण्यात आली. काही तासांच्या शोधानंतर दत्त चौक परिसरात ती महिला आढळून आली.










